ह्या आठवड्यात आपणास कौटुंबिक मतभेद व तणावास सामोरे जावे लागू शकते, तेव्हा बोलताना चुकीचे शब्द व वागणूक ह्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या उत्तरार्धात दिलासा मिळू शकतो. आपल्या एखाद्या मित्राच्या सहकार्याने नवीन कार्याची योजना बनविण्यात मदत होईल. परदेशात कारकीर्द घडविण्यास किंवा व्यापार करण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रणयी जीवनात आपसातील भावना दुर्लक्षित करून कोणताही निर्णय घेऊ नये. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा मान राखावा. आठवड्याच्या सुरवातीस आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागू शकते. आपणास ऋतुजन्य विकारांचा सामना करावा लागू शकतो. विनाकारण झालेल्या धावपळीमुळे व खर्चांमुळे आपले मन काहीसे उदास राहू शकते. कार्यक्षेत्री आपल्या विरोधकांच्या अडथळ्यांचा सामना आपणास करावा लागू शकतो.