Lokmat Astrology

दिनांक : 21-Nov-24

राशी भविष्य

 मकर

मकर

हे नवीन वर्ष आपल्यासाठी खूपच चांगले असणार आहे. ह्या वर्षी आपणास आर्थिक प्राप्ती सुद्धा उत्तम होईल. आजवर आपण जे काही प्रयत्न केले आहेत, त्यातून आता आपणास भरपूर पैसा मिळणार आहे. असे असले तरी खर्च सुद्धा होणार आहेत, परंतु अर्थ प्राप्ती चांगली झाल्याने आपली सर्व कामे सुरळीत होतील. आजवर आपण जितक्या समस्यांना सामोरे गेला आहात व जे काही प्रश्न आपल्या समोर आले आहेत, ते सर्व काही हळू - हळू दूर होतील. कौटुंबिक आघाडीवर वर्षाची सुरवात आपल्यासाठी चांगलीच असेल. गुरुकृपेने कुटुंबात ऐक्य राहील. माता - पित्यांचे सहकार्य व पाठिंबा सुद्धा आपणास मिळेल. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या व्यापारात उन्नती होईल. आपण काही मोठे निर्णय घेऊ शकाल. त्यात त्यांची महत्वाची भूमिका असेल. आपणास पैतृक संपत्ती सुद्धा मिळू शकते. कुटुंबात आपले प्रभुत्व वाढेल. आपणास मोठा सन्मान मिळून लोक आपले म्हणणे ऐकतील. आपण पौष्टिक आहार घेऊन आपल्या उत्तम आरोग्याचा आनंद सुद्धा घेऊ शकाल. कोणतेही काम पैश्यांच्या अभावी अडून राहणार नसल्याने आपण निश्चिन्त राहावे. बराचसा वेळ मित्रांच्या सहवासात घालवाल. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. समाज माध्यमांवर सुद्धा आपण बरेचसे कार्यरत राहाल व आपल्या फॉलोवरची संख्या सुद्धा वाढणार आहे. तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वात कशी सुधारणा करावयाची ह्याकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. हे वर्ष आपणास बरेच काही देणारे आहे. आपणास परदेशात जाऊन आपले कौशल्य दाखविण्याची संधी सुद्धा मिळू शकते. आपला एखादा छंद जोपासण्यासाठी हे वर्ष उत्तमच आहे. ह्या वर्षात भरपूर प्रवास सुद्धा होतील. लहान - सहान प्रवास करून आपण ताजेतवाने व्हाल. मित्रांसह बाहेर फिरावयास जाण्याचा बेत सुद्धा ठरवाल. कुटुंबियांसह तीर्थक्षेत्रा व्यतिरिक्त रमणीय ठिकाणी फिरावयास गेल्याने आपणास नवीन ऊर्जा प्राप्त होईल. आपल्यातील कठोरपणा आपणास अनेकदा अडचणीत सुद्धा टाकू शकतो, कारण आपण खरे बोलाल ज्यात कठोरपणा असेल व तो समोरच्या व्यक्तीस रुचणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सतर्क राहण्या व्यतिरिक्त कोणाशीही कटू बोल बोलू नका. अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. धर्म - कर्माकडे आपला कल वाढेल व आपण एखाद्या धार्मिक स्थळाच्या निर्माणात सुद्धा आपला खारीचा वाटा उचलू शकाल.

राशी भविष्य

21-11-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण षष्ठी

नक्षत्र : पुष्य

अमृत काळ : 09:34 to 10:58

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:47 to 11:35 & 15:35 to 16:23

राहूकाळ : 13:45 to 15:09