Lokmat Astrology

दिनांक : 23-Apr-25

राशी भविष्य

 मीन

मीन

या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी काहीशी प्रतिकूल असू शकते. आपल्या जीवनात खूप चढ - उतार येणार आहेत. त्यासाठी आपणास आत्तापासूनच तयारी करावी लागेल. या वर्षाच्या सुरवाती पासूनच आपले व्यक्तिगत जीवन, आपले आरोग्य व आपली आर्थिक स्थिती अशा तिन्ही गोष्टींवर आपणास लक्ष द्यावे लागेल. या तिन्ही क्षेत्रात चढ - उतारांचा सामना आपणास करावा लागू शकतो. वर्षाच्या सुरवातीपासूनच आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपणास पाय दुखी, टाचेचे दुखणे, नडगीचे दुखणे, नेत्र समस्या, एखादा संसर्ग व यकृताशी संबंधित समस्या त्रस्त करू शकतात. सुरवातीस कदाचित या समस्या सौम्य प्रमाणात असू शकतात, परंतु आपण जर त्याकडे दुर्लक्ष केलेत तर आपणास मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वर्षाच्या सुरवातीस खर्चात वाढ होऊन आपल्या बचतीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपणास आपल्या आर्थिक स्थितीवर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. योग्य आर्थिक नियोजन करून आपणास आर्थिक बाजू सांभाळावी लागेल. वैवाहिक जीवनासाठी वर्षाची सुरवात काहीशी प्रतिकूल आहे. आपण व आपला वैवाहिक जोडीदार या दरम्यान गैरसमजाचा अतिरेक झाल्याने आपले वैवाहिक नाते काहीसे गढूळ होईल. अशा स्थितीत थोडे सावध राहावे लागेल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा पाठिंबा आपल्या कामी येईल, जी निव्वळ आपले नाते वाचवणार नाही तर त्यात सुधारणा करण्यासाठी मदत सुद्धा करेल. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरवात काहीशी प्रतिकूल आहे. आपण व आपल्या प्रेमिके दरम्यान गैरसमजाहून जास्त अहंकाराशी संबंधित बाबी राहतील. ती जास्त क्रोधीत होऊन आपणास त्रास देईल. त्यामुळे आपल्या नात्याचा धागा काहीसा कमकुवत होऊ शकतो. कारकिर्दीच्या बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना वर्षाच्या सुरवातीस उत्तम यश प्राप्त होईल. व्यापाऱ्यांना मात्र काही त्रास सोसावा लागू शकतो. व्यावसायिक भागीदारी तुटू शकते. विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरवात काहीशी त्रासदायी असेल. असे असले तरी वर्षाच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल, जी वर्ष अखेर पर्यंत सुरूच राहील. वर्षाच्या सुरवातीच्या काही महिन्यात परदेशात जाण्यात आपण यशस्वी होऊ शकता. आपण जर त्यासाठी प्रयत्न करत असाल तर आपणास यश नक्कीच मिळेल. मात्र, खर्च भरमसाठ वाढतील. त्यावर आपणास लक्ष ठेवावे लागेल. आपल्या सभोवतालच्या लोकांवर नजर ठेवावी. त्यातील काहीजण आपला गैरफायदा घेण्याची संभावना आहे.

राशी भविष्य

22-04-2025 मंगळवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : श्रावण

अमृत काळ : 12:34 to 14:10

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:38 to 9:26 & 11:50 to 12:38

राहूकाळ : 15:45 to 17:20