Lokmat Astrology

दिनांक : 21-Nov-24

राशी भविष्य

 धनु

धनु

आपण स्वभावाने कर्तव्याप्रती व जीवनाच्या उद्देशांप्रती दृढ निश्चयी असता. असे असले तरी आपण त्वरित क्रोधीत होत असता. परंतु आपले लक्षांक गाठणे हे आपले ध्येय असते. आपले विचार स्वतंत्र असतात व इतरांनी आपल्या विचारांच्या विरोधात जाऊ नये अशी अपेक्षा बाळगून असता. ह्या वर्षी आपण नवीन उंची गाठण्यात यशस्वी व्हाल. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपला आत्मविश्वास उंचावलेला असल्याने जीवनातील विविध क्षेत्रात आपण यशस्वी व्हाल. आपल्या आर्थिक प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. वर्षाच्या सुरवातीसच मोठा धनलाभ संभवतो. आपण सढळ हस्ते पैसा खर्च कराल. आपल्या मनोरंजना व्यतिरिक्त आवश्यक वस्तूंसाठी सुद्धा भरपूर पैसा खर्च कराल. वर्षाची सुरवात आरोग्यास चांगली असली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये. आपली दिनचर्या व व्यायाम किंवा ध्यानधारणे बरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची नितांत गरज आहे. कौटुंबिक आघाडीवर हे वर्ष काहीसे त्रासदायी ठरणारे आहे. कुटुंबियात आपसात योग्य समन्वय नसल्याने अनेकदा भांडणाची किंवा वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. आपणास गृहसौख्यात कमतरता असल्याचे जाणवेल. आपण आपल्या कामात अति व्यस्त राहाल, व त्यामुळे घराकडे सुद्धा योग्य तितके लक्ष देऊ शकणार नाही. परदेशात जाण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना वर्षाच्या सुरवातीस यश मिळू शकते. त्या नंतर त्यांना ऑगस्ट महिन्या पर्यंत वाट बघावी लागू शकते. आपणास जर एखादे वाहन खरेदी करावयाचे असेल तर त्यासाठी हे वर्ष विशेष अनुकूल नसल्याने ते विचारपूर्वक करावे. विशेष मुहूर्त बघूनच वाहन खरेदी करणे आपल्यासाठी हितावह होईल. शनी महाराजांच्या कृपेने आपली बरीचशी कामे होऊ लागतील, व त्यामुळे आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन आपण जीवनात प्रगती करू शकाल. नोकरी असो किंवा व्यापार किंवा स्वयं रोजगार सर्व क्षेत्रात आपली कामगिरी उत्तम होईल. ह्या वर्षी आपणास आपल्या एखाद्या भावंडास मदत करण्याची संधी मिळेल, जी आपल्या जीवनासाठी एक महत्वाची घटना असेल. अशा परिस्थितीत आपण जर त्यांना मदत केलीत तर ते आयुष्यभर आपली आठवण काढतील व त्यांच्याशी आपल्या संबंधात सुद्धा सुधारणा होईल.

राशी भविष्य

21-11-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण षष्ठी

नक्षत्र : पुष्य

अमृत काळ : 09:34 to 10:58

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:47 to 11:35 & 15:35 to 16:23

राहूकाळ : 13:45 to 15:09