Lokmat Astrology

दिनांक : 23-Apr-25

राशी भविष्य

 कन्या

कन्या

२०२५ च्या सुरवातीस आपणास मानसिक तणाव व बेचैनी जाणवेल. कार्यात यश न मिळाल्याने आपले मन निराश होऊ शकते. आपल्या कुटुंबियांशी असलेल्या संबंधात अहंकार आड येणार नाही याची काळजी आपणास घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात सुद्धा काही समस्या उदभवू शकतात. त्यामुळे आपण व आपला वैवाहिक जोडीदार या दरम्यान काही सामान्यता राहणार नाही. हि स्थिती टाळण्यासाठी आपणास खूप प्रयत्न करावे लागतील. या वर्षात व्यापाराशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. मात्र, दूरवरचे प्रवास करून आपणास लाभ होईल. नशिबाची साथ मिळाल्याने वर्षाच्या उत्तरार्धात आपली प्रलंबित कामे होऊन आपण कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. स्वतःवर विश्वास ठेवावा इतकेच. या वर्षात आर्थिक लाभ होण्याची संभावना असली तरी वर्षाच्या सुरवातीस खर्चात वाढ होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. मार्च महिन्या नंतर व्यापारात दीर्घकालीन गुंतवणुकीतून लाभ होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश प्राप्त झाल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. मित्रांची मदत होईल. वर्षाच्या सुरवातीस कौटुंबिक जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागला तरी नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतील. वर्षाच्या उत्तरार्धात नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. या वर्षात शक्य तितके स्वतःला मानसिक ताणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचा फायदा असा होईल कि आपण प्रत्येक काम उत्तम प्रकारे करू शकाल. ऑक्टोबर नंतर आपल्या प्राप्तीत तेजी येईल. वर्षाचा उत्तरार्ध प्रणयी जीवनास अनुकूल आहे. आपला प्रेम विवाह होण्याची संभावना सुद्धा आहे. या वर्षी अनेक बाबतीत आपण नशीबवान ठराल. त्यामुळे आपल्या कामात आपण यशस्वी व्हाल. वर्षाच्या सुरवातीस आपण परदेशात जाऊ शकता. या वर्षी आपल्या वडिलांची प्रकृती नाजूक होऊ शकते. अधून - मधून आईची काळजी सुद्धा आपणास घ्यावी लागेल. तेव्हा आपल्या आई - वडिलांची काळजी घ्या. आपण सुद्धा आपल्या आहारावर लक्ष ठेवावे. अति खाऊन आपण सुद्धा आजारी पडण्याची शक्यता आहे.

राशी भविष्य

22-04-2025 मंगळवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : श्रावण

अमृत काळ : 12:34 to 14:10

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:38 to 9:26 & 11:50 to 12:38

राहूकाळ : 15:45 to 17:20