Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ८ जून २०२३ : आर्थिक आवक मनासारखी राहणार, नव्या नोकरीचीही संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 07:20 AM2023-06-08T07:20:23+5:302023-06-08T07:20:45+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष- मनात द्विधा विचार राहतील. मात्र स्वतःला कामात गुंतवून घेतल्यास सकारात्मकता वाढेल. कितीही कामे केली तरी आटोपणार नाहीत. त्यामुळे कामांची यादी बनवून प्राधान्यक्रमाने कामे करा. नोकरीत कामाचा ताण राहील, ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.
वृषभ- मनात सकारात्मक विचार राहतील. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कामाचा वेग पावेल. नातेवाइकांची ख्यालीखुशाली कळेल. प्रवासात सतर्क राहा. तुमची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवा.
मिथुन- संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील. त्यामुळे तुमचा वेळ आणि श्रम कमी खर्च होतील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. जाणकार मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. योग्य ठिकाणीच खर्च होईल असे पाहा.
कर्क- आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. सहकारी वर्गाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. त्या जोरावर अनेक कामे पूर्ण कराल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरातील सदस्याशी समन्वय राखा. फार दगदग होईल, अशी कामे करू नका.
सिंह- मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्याची गरज आहे. अकारण काळजी करणे थांबवा. स्वतःहून कुणाच्या वाट्याला जाऊ नका. आपली कामे चोखपणे करत राहा. घरी पाहुणे मंडळी येतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.
कन्या - हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळेल. अनेक अनुकूल घटना घडतील, व्यवसायात भरभराट होईल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. तुमचे बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. मनात आनंदी विचार राहतील.
तूळ - महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. लोकांना कठोर बोलून नाराज करू नका. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्या
वृश्चिक- एखाद्या समारंभात सहभागी भेटीगाठी होतील. लोक तुमची प्रशंसा करतील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. चांगल्या बातम्या कळतील. एखाद्या कामात सतत व्यस्त राहाल.
धनू- मनात नवीन काही तरी करून दाखवण्याची ऊर्मी येईल. त्यासाठी माहिती गोळा कराल. एखाद्या उपक्रमात सहभागी व्हाल. लोकाचे चांगले सहकार्य मिळेल. स्वतःसाठी वेळ देता येईल. आर्थिक आवक मनासारखी राहील. नवीन नोकरी मिळेल.
मकर- सरकारी कामे करण्यासाठी वेळ द्याल. कागदोपत्री पूर्तता करावी लागेल. त्यात यश मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. काहींना प्रवास घडून येईल. विविध प्रकारचे फायदे होतील. रहदारीचे नियम नीट पाळा.
कुंभ- नोकरीत आपली कामे चोखपणे बजावली पाहिजेत. कामात चालढकल करू नका. वेळेचे व्यवस्थापन नीट करा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. सकारात्मक विचार करा.
मीन- आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. 'नातेवाइकांची ख्यालीखुशाली कळेल. मनात काळजीचे विचार राहतील. इतरांशी तुलना न करता स्वत:च्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले तर बरे होईल. सरकारी कामे मार्गी लागतील.
विजय देशपांडे | ज्योतिषविशारद )