Horoscope: आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२३; वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 07:29 AM2023-05-01T07:29:45+5:302023-05-01T07:36:04+5:30

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Horoscope: Today's Horoscope, 01 May 2023; Elders will benefit. Respect will increase in the society | Horoscope: आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२३; वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल

Horoscope: आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२३; वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल

googlenewsNext

मेष:  आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणे हितावह राहील. पोटदुखीचा त्रास संभवतो. शक्यतो आज प्रवास टाळावा. सरकारी कामात यश मिळेल.  आणखी वाचा 

वृषभ:  आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल.  आणखी वाचा 

मिथुन: सरकारकडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्‍यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. आणखी वाचा    

कर्क:  शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. आणखी वाचा 

सिंह:  कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा 

कन्या:  शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा व संतापाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल.  आणखी वाचा 

वृश्चिक:  वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा 

धनु:  मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. आणखी वाचा 

मकर:  आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा.  आणखी वाचा 

कुंभ:  आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा 

मीन:  शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल. आणखी वाचा 

Web Title: Horoscope: Today's Horoscope, 01 May 2023; Elders will benefit. Respect will increase in the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app