Horoscope: आजचे राशीभविष्य, ७ मे २०२३: विदेशातील मित्र, नातेवाईकाकांडून आनंदाची बातमी येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 07:29 AM2023-05-07T07:29:45+5:302023-05-07T07:32:16+5:30
Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष: आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आणखी वाचा
वृषभ: व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. आणखी वाचा
मिथुन: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. आणखी वाचा
कर्क: आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. आणखी वाचा
सिंह: आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. आणखी वाचा
कन्या: आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
तूळ: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. आणखी वाचा
वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. आणखी वाचा
मकर: आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. आणखी वाचा
कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. आणखी वाचा
मीन: आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणार्या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा