Raksha Bandhan 2022: तुमच्या भावाची रास कोणती? रक्षाबंधनाला ‘या’ रंगाची राखी बांधा; दीर्घायुष्य अन् शुभ-लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 08:27 AM2022-08-07T08:27:39+5:302022-08-07T08:30:28+5:30

Raksha Bandhan 2022: तुम्हाला तुमच्या भावाची रास माहिती असेल, तर या रक्षाबंधनाला त्याच्या राशीच्या लकी रंगानुसार राखी बांधा. जाणून घ्या...

rakshabandhan 2022 ties this colour rakhi as per to zodiac signs of your brother for auspicious benefits on raksha bandhan | Raksha Bandhan 2022: तुमच्या भावाची रास कोणती? रक्षाबंधनाला ‘या’ रंगाची राखी बांधा; दीर्घायुष्य अन् शुभ-लाभ मिळवा

Raksha Bandhan 2022: तुमच्या भावाची रास कोणती? रक्षाबंधनाला ‘या’ रंगाची राखी बांधा; दीर्घायुष्य अन् शुभ-लाभ मिळवा

googlenewsNext

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीचा पवित्र सण तर आहेच, पण तो वर्षानुवर्षे नात्यातील बंध अधिक दृढ करतो. रक्षाबंधनाचा हा सण रेशमाच्या धाग्यांनी बांधलेला भाऊ-बहिणीचा बंध आणखी घट्ट करतो. जेव्हा तुम्ही तुमच्या भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधाल, तेव्हा हे नाते अधिक भक्कम होईल. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीसाठी एक खास रंग असतो, जो त्यांच्यासाठी शुभ मानला जातो. जर तुम्हीही तुमच्या भावाला त्याच्या राशीनुसार शुभ रंगाची राखी बांधली तर तुमचे नाते तर मजबूत होईलच पण तुमच्या भावाला दीर्घायुष्य लाभू शकेल. कोणत्या रंगाची राखी सर्व राशींसाठी शुभ राहील, जाणून घेऊया... (Rakshabandhan 2022)

मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे या राशीच्या भावांसाठी लाल रंगाची राखी सर्वात शुभ राहील. 

वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र मानला जातो. जर तुमच्या भावाची राशी देखील वृषभ असेल तर तुम्ही त्याला पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची राखी बांधावी. 

मिथुन:  या राशीचा स्वामी बुध आहे, ज्याला हिरवा रंग सर्वात प्रिय आहे. त्यामुळे या राशीच्या भावांनी हिरव्या रंगाची राखी बांधावी. यामुळे भाऊ आणि बहीण दोघांची बुद्धिमत्ता उजळेल.

कर्क: या राशीचा चंद्र कर्क मानला जातो, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी पांढरी राखी सर्वात शुभ मानली जाईल. हे त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य देऊ शकेल.

सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि त्याचा आवडता रंग लाल किंवा पिवळा आहे. जर तुमचा भाऊ या राशीचा असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी त्याला लाल किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी.

कन्या:  या राशीचा स्वामी बुध आहे आणि या ग्रहासाठी हिरवा हा सर्वांत शुभ रंग आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना हिरव्या रंगाची राखी बांधणे शुभ राहील. असे केल्याने तुमच्या भावाला त्याची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करण्यास मदत होईल.

तूळ:  या राशीचा स्वामी शुक्र आहे. भावाचे आयुष्य दीर्घ व्हावे अशी बहिणींना इच्छा असेल तर तूळ राशीच्या भावाला गुलाबी रंगाची राखी बांधावी.

वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ मानला गेला आहे. तुमचा भाऊ या राशीचा असेल तर या रक्षाबंधनाला तुम्ही त्याला लाल किंवा मातट रंगाची राखी बांधावी. हे त्यांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत करेल.

धनु: या राशीचा स्वामी गुरु मानला जातो. या राशीच्या लोकांचा शुभ रंग पिवळा किंवा केशरी मानला जातो. भावाला व्यावसायिक जीवनात यश मिळावे यासाठी बहिणींनी त्याला पिवळी किंवा लाल राखी बांधावी.

मकर: या राशीचा स्वामी शनी असल्याने भाग्यशाली रंग निळा किंवा जांभळा मानला जातो. शनी देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा यासाठी बहिणींनी भाऊरायाला निळ्या रंगाची राखी बांधावी. 

कुंभ: या राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे ज्या बहिणींना आपल्या भावांनी नेहमी आनंदी आणि हसते राहावे असे वाटते, त्यांनी या रक्षाबंधनाला जांभळ्या रंगाची राखी बांधावी.

मीन: या राशीचा स्वामी देवगुरू बृहस्पती म्हणजेच गुरु आहे. या राशीच्या लोकांसाठी शुभ रंग पिवळा किंवा केशरी आहे. तुमच्या भावांनी प्रत्येक वाईट गोष्टीपासून दूर राहावे, यासाठी बहिणींनी केशरी रंगाची राखी बांधावी.
 

Web Title: rakshabandhan 2022 ties this colour rakhi as per to zodiac signs of your brother for auspicious benefits on raksha bandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app