Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - 23 ऑगस्ट 2022 : मिथुनसाठी आजचा दिवस आनंदाचा तर कर्कसाठी काळजीचा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 07:14 AM2022-08-23T07:14:53+5:302022-08-23T07:17:07+5:30
Today Daily Horoscope 23 August 2022 : कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य...
मेष: चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. आणखी वाचा...
वृषभ: चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. आणखी वाचा...
मिथुन: आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आणखी वाचा...
कर्क: आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. आणखी वाचा...
सिंह: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. आणखी वाचा...
कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता आहे. आणखी वाचा...
तूळ: आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायात मोठा फायदा संभवतो. आणखी वाचा...
वृश्चिक: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील. आणखी वाचा...
धनु: आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमालाप करू शकाल. आणखी वाचा...
मकर: चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. आणखी वाचा...
कुंभ: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्याने कोणताही महत्वाचा निर्णय न घेणे हेच हितावह राहील. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. आणखी वाचा...
मीन: चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज उत्साह व स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र व नातेवाईक यांच्या बरोबर वाद - विवाद होईल. आणखी वाचा...