आजचे राशीभविष्य - ०९ डिसेंबर २०२३, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, 'या' राशींना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 07:27 AM2023-12-09T07:27:16+5:302023-12-09T07:28:38+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - राग व अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आपल्या कामाचे कौतुक होईल. शक्यतो वाद टाळा. वाहनसुख चांगले मिळेल. आणखी वाचा
वृषभ - स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. कार्यालयीन कामे पूर्ण होतील. आणखी वाचा
मिथुन - पचनसंस्येचे विकार बळावतील. जोडीदाराच्या तब्बेतीची सुद्धा चिंता वाटेल. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला दिवस. प्रवासात त्रास संभवतो. आणखी वाचा
कर्क - स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. झोपही शांत मिळणार नाही. एखादी मानहानी संभवते. आणखी वाचा
सिंह - कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदीत होतील. भावनिक संबंध प्रस्थापीत होतील. कलाक्षेत्रात रुची राहील. मानसिक दृष्टया दिवस चांगला जाईल. आणखी वाचा
कन्या - बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र त्यात संभाव्य वाद टाळावे लागतील. स्वादिष्ट बोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आयात - निर्यात संबंधित व्यापारात यश प्राप्ती होईल. आणखी वाचा
तूळ - खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल. अलंकार, मनोरंजन, आनंद इत्यादींसाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा
वृश्चिक - संबंधितांबरोबर काही अप्रिय घटना घडू शकते. आज मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामे जपून करा. अविचाराने केलेला व्यवहार अडचणीत आणू शकतो. आणखी वाचा
धनु - संतती व पत्नी ह्यांच्या कडून लाभ होईल. व्यापारात फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा
मकर - वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणा विषयी समाधान वाटेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. पैसा व प्रतिष्ठा मिळेल. मित्र व नातेवाईकांकडून लाभ होतील. आणखी वाचा
कुंभ - आनंद - सोहळा, प्रवास- पर्यटन ह्यावर पैसा खर्च होईल. प्रवास व सहलीची शक्यता आहे. परदेशातून काही बातमी मिळेल. संतती विषयक काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. आणखी वाचा
मीन - खर्चात वाढ होईल. शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. इस्टेटीतून फायदा होईल. अवैध कामा पासून दूर राहावे. आपले श्रम कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणखी वाचा