आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२३ : योग्य जोडीदार मिळेल, मिथुन राशीसाठीही खास दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 07:15 AM2023-11-26T07:15:20+5:302023-11-26T07:27:55+5:30
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न व्हाल. आणखी वाचा
वृषभ - आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. आणखी वाचा
मिथुन- आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास वाढेल. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल. आणखी वाचा
कर्क- आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आणखी वाचा
सिंह- आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. आणखी वाचा
कन्या - आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आणखी वाचा
तूळ- आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. आणखी वाचा
वृश्चिक- आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. आणखी वाचा
धनु- आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मकर- आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. आणखी वाचा
कुंभ- आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. आणखी वाचा
मीन- कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खाण्या - पिण्याच्या बेपर्वाहीमुळे आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा