आजचे राशीभविष्य - ४ ऑक्टोबर २०२३, वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 07:33 AM2023-10-04T07:33:08+5:302023-10-04T07:40:08+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope - October 4, 2023, you will get comfort in clothing, vehicle and food | आजचे राशीभविष्य - ४ ऑक्टोबर २०२३, वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल

आजचे राशीभविष्य - ४ ऑक्टोबर २०२३, वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल

googlenewsNext

मेष - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील.  आणखी वाचा  

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. आणखी वाचा 

मिथुन - आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय व संततीशी मतभेद संभवतात. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत.  आणखी वाचा 

कर्क  - आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल.  आणखी वाचा

सिंह -  आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल.  आणखी वाचा 

कन्या -  आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल.  आणखी वाचा 

तूळ -  आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल.  आणखी वाचा 

वृश्चिक - आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल.  आणखी वाचा 

धनु -  आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आणखी वाचा 

मकर -  निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीशी मतभेद होतील.  आणखी वाचा 

कुंभ - आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील.  आणखी वाचा 

मीन - महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा व मानसिक स्थैर्य ह्यामुळे कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope - October 4, 2023, you will get comfort in clothing, vehicle and food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app