ठळक मुद्देभारताला 48 वर्षांमध्ये तिहेरी उडीत हे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताला अरपिंदर सिंगने तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. भारताचे हे या स्पर्धेतील दहावे सुवर्णपदक आहे. अरपिंदरने 16.77 मी. लांब उडी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला 48 वर्षांमध्ये तिहेरी उडीत हे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.
भारताला आतापर्यंत तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक पटकावता आले नव्हते. अरपिंदर सिंगने देदिप्यमान कामगिरी करत भारताला हे ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे.