बर्लिन : भारतीय तिरंदाजांची विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यातील मोहीम शनिवारी पदकविना संपली. पदकाची अखेरची आशा असलेला भारताचा पुरुष कम्पाऊंड संघदेखील चौथ्या स्थानावर घसरला.तिस-या स्थानासाठी झालेल्या लढतीत जर्मनीकडून भारत २२५-२२७ अशा फरकाने पराभूत झाला.तिसरे मानांकन असलेल्या भारतीय संघातील अभिषेक वर्मा, अमन सैनी, अमनजितसिंग यांनी पहिल्या फेरीत ५७ गुण पटकावीत जर्मनीची बरोबरी केली होती.दुसºया फेरीत प्रतिस्पर्धी संघाने ११५ तर भारताने १११ गुण मिळविले. तिसºया आणि अखेरच्या फेरीत जर्मनीने सहापैकी चार प्रयत्नांत दहा गुणांची कमाई केली. या फेरीत भारताने ५८ गुणांची कमाई केली खरी, पण विजयासाठी दोन गुण कमी पडले.या पराभवामुळे जर्मनी कांस्याचा मानकरी ठरला तर भारत चौथ्या स्थानावर राहिला.शांघायमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात भारतीय कम्पाऊंड संघाने एक सुवर्ण जिंकले होते. अंताल्यातील दुसºया टप्प्यात संघाला कांस्यावर समाधान मानावे लागले होते. (वृत्तसंस्था)
विश्व तिरंदाजीत भारताची पदकाची झोळी रिकामीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 2:25 AM