मुंबई : सध्याच्या घडीला लहान मुलं खेळतात, पण ती मोबाईमध्ये. त्यामुळे सध्याची युवा पीढी ही जास्त मैदानात खेळताना दिसत नाही. या साऱ्या गोष्टी भारताची माजी धावपटू पीटी उषाला समजल्या आहेत. त्यामुळेच मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला, असा संदेश तिने युवा पीढीला दिला आहे.
उषा म्हणाल्या, " सध्याच्या घडीला लहान मुलं मैदानात फार कमी दिसतात. मोबाईलमध्ये गेम खेळण्यामध्येच त्यांना अधिक रस आहे. पण ते फक्त मोबाईलमध्ये खेळ खेळत राहीले तर भारताला चांगले खेळाडू मिळू शकणार नाहीत. मोबाईल वाईट आहे, असे मला म्हणायचे नाही. पण प्रत्येकाने एखाद्या गोष्टीचा किती आणि कसा वापर करायचा हे ठरवायला हवे. आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी मोबाईल कमी वेळा वापरले होते, त्यामुळे त्यांना चांगली कामगिरी करता आली. "