नवी दिल्ली : अॅथलेटिक्स प्रशिक्षक दिवंगत रामकृष्णन गांधी व रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदकविजेता टी. मेरियाप्पनचे प्रशिक्षक सत्यनारायण यांच्या नावाची यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली.गांधीने गुरमित सिंगला प्रशिक्षण दिले होते. त्याने गेल्या वर्षी जपानच्या नाओमीमध्ये आशियाई रेसवाकिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. बलजिंदर सिंगने नाओमीमध्ये २० किलोमीटरअंतराच्या चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. त्याने गांधींच्या मार्गदर्शनाखाली सरावकेला होता.गांधींनी एक दशकापर्यंतभारतीय अॅथलेटिक्समध्ये प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली. त्यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले.द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तिसरे नाव कबड्डी प्रशिक्षक हिरानंद कटारिया यांचे आहे. साक्षी मलिकचे प्रशिक्षक कुलदीप मलिक वमनदीप सिंग यांच्या नावांवर चर्चा झाली, पण त्यावर एकमत झाले नाही. (वृत्तसंस्था)द्रोणाचार्य पुरस्कार : दिवंगत रामकृष्णन गांधी (अॅथलेटिक्स), हिरानंद कटारिया (कबड्डी), सत्यनारायण (पॅराअॅथलिट-जीवनगौरव पुरस्कार), जीएसएसव्ही प्रसाद (बॅडमिंटन), ब्रजभूषण मोहंती (बॉक्सिंग), पी. ए. रफेल (हॉकी), संजय चक्रवर्ती (नेमबाजी), रोशन लाल (कुस्ती). ध्यानचंद पुरस्कार - भूपेंदर सिंग (अॅथलेटिक्स), सय्यद शाहिद हकीम (फुटबॉल), सुमराई तेते (हॉकी).
रामकृष्णन, सत्यनारायण यांची ‘द्रोणाचार्य’साठी शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 1:23 AM