शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मानधन व भत्त्यातून सरपंचांनी गावाला दिले दोन वॉटर कूलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 5:49 PM

रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील सरपंच श्रीकांत महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार वर्षांचे मानधन व भत्त्याच्या रकमेतून गावकऱ्यांची तृष्णा भागवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी दोन उच्च क्षमतेचे वॉटर कूलर बसवून दिले. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देतांदलवाडी येथील आदर्श सरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा आदर्श उपक्रमग्रामस्थांमधून व्यक्त होतेय समाधान

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील तांदलवाडी येथील सरपंच श्रीकांत महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार वर्षांचे मानधन व भत्त्याच्या रकमेतून गावकऱ्यांची तृष्णा भागवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी दोन उच्च क्षमतेचे वॉटर कूलर बसवून दिले. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.एखाद्या शहराला लाजवेल अशा रचनात्मक विकासात भरारी घेतलेल्या तांदलवाडी गावात महाम़ंडलेश्वर श्री जनार्दन स्वामी हरी महाराज व मानेकर शास्त्री महाराज, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते श्रीराम मंदिर परिसर व नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात दोन वॉटर कूलरचे लोकार्पण करण्यात आले. निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाचे केळी उत्पादन साता समुद्रापार जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याचा नावलौकिक मिळवलेल्या या प्रगतशील गावाला रावेर कृउबा समिती संचालक श्रीकांत महाजन यांनी ग्रामविकासाचा नवा आयाम धरत सरपंच पदाची धुरा सांभाळली आहे.गत चार वर्षांचे सरपंच मानधन ६३ हजार व ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता ४२ हजार रुपये असे एकूण १ लाख पाच हजार रूपये व्यक्तिगत कामासाठी न खर्च करता, सर्व ग्रा.पं.पदाधिकाºयांनी या मानधनाच्या रकमेतून गावात दोन वॉटर कूलर बसवले आहेत. या निर्णयाने ग्रामपंचायत पदाधिकारीयांचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.लोकार्पणप्रसंगी पं.स.सदस्या कविता कोळी, पोलीस पाटील सुधाकर चौधरी, किरण नेमाडे (खिर्डी), हरलाल कोळी, सदस्य मानसी पाटील, नारायण पाटील, नितीन महाजन, सुनील चौधरी, अरुण पाटील, गोकुल झाल्टे, जितेंद्र महाजन, उदय तायडे, गोकुळ चौधरी, नितीन सपकाळे, अरुण महाजन, प्रल्हाद पाटील, दत्तात्रय तायडे, राहुल पाटील, गोपाळ पाटील, सुमित पाटील, सुबोध महाजन, डॉ.वैभव पाटील, गणेश नामायते, मनोहर पाटील, प्रशांत महाजन, अंकूश महाजन, श्रीराम ठाकूर, डी.सी.पाटील, उदय चौधरी, विठ्ठल चौधरी, रमेश उन्हाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर