दोहा : भारतीय मिश्र रिले संघ येथे सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठत टोकियो येथे होणाऱ्या आॅलिम्पिकस्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. शनिवारी झालेल्या स्पर्धेत ४ बाय ४०० मिटर प्रकारात भारताच्या संघाने अंतिम फेरी गाठली.मोहम्मद अनस, व्ही.के. विस्मय, जिस्ना मॅथ्यू व टॉम निर्मल नोह यांचा समावेश असणाºया संघाने ३ मिनिट १६.१४ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत तिसरा तर हिटमध्ये दुसरा क्रमांकासह अंतिम फेरी गाठली.प्रत्येक दोन हिटमधील पहिले तीन संघ रविवारी होणाºया अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. अंतिम फेरीत पोहचलेले आठ संघ टोकियो येथे २०२० मध्ये होणाºया आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.दरम्यान, भारतीय धावपटू द्युती चंद हिचे विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेतील आव्हान शनिवारी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. शनिवारी द्युती चंद हिने येथे महिलांच्या १०० मीटर शर्यतीत या हंगामातील सर्वांत खराब वेळ ११.४८ सेकंद नोंदवली.द्युती हिट क्रमांक तीनमध्ये सातव्या आणि एकूण ४७ स्पर्धकांमध्ये ३७ व्या क्रमांकावर फेकली गेली. आॅलिम्पिक २०१२ ची चॅम्पियन जमैकाची शैली एन. फ्रेजर प्रिस हिने १०.८० सेकंद आणि आयवरी कोस्टची गतवेळेसची रौप्यपदकप्राप्त मेरी जोस ता लू हिने १०.८५ सेकंदांची वेळ नोंदवली. भारताचा लांबउडीपटू एम. श्रीशंकर याला पात्रता फेरीतच २२व्या क्रमांकावर समाधान मानावेलागले.जाबीर पराभूतपुरुषांच्या ४०० मिटर अडथळा शर्यतील भारताच्या एम.पी.जाबीरने उपांत्यफेरी गाठत अपेक्षा उंचावल्या होत्या.मात्र जाबीरने ही स्पर्धा ४९.७१ या वेळात पूर्ण केली. तो १६ व्या स्थानी राहिला. सध्याचा जागतिक चॅम्पियन वारलोल्म याने ४८.२८ सेकंदासह अंतिम फेरी गाठली.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा :भारतीय मिश्र रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 4:15 AM