नवी दिल्ली : नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने शुक्रवारी जर्मनची कार निर्माता कंपनी फोक्सवॅगनला 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. तीन वर्षांपूर्वी कंपनीने डिझेलच्या वाहनांमध्ये कार्बन उत्सर्जन कमी दाखविण्यासाठी छेडछाड केली होती.
एनजीटीचे अध्यक्ष आदर्श कुमार गोयल यांच्या समितीने पर्यावरण मंत्रालय, उद्योग मंत्रालय, सीपीसीबी आणि ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशनच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती बनविली होती. त्यांना फोक्सवॅगन कंपनीने असा प्रकार करून पर्यावरणाचे किती नुकसान केले आहे याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये फोक्सवॅगन दोषी आढळली आहे.
फोक्सवॅगन कंपनीचा सप्टेंबर 2015 मध्ये हा घोटाळा उघड झाला होता. 2008 ते 15 या काळात कंपनीने 1.11 कोटी गाड्या विकल्य़ा होत्या. या गाड्यांमध्ये कार्बन उत्सर्जन चाचणीवेळी कमी उत्सर्जन दाखविण्यासाठी छेडछाड केली होती. यामुळे चाचणीवेळी गाडी कमी उत्सर्जन दाखवित होती. खरेतर या गाड्यांमध्ये नायट्रस ऑक्साईड हा वायू उत्सर्जन करत होती.