बंगळुरुस्थित इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनी 'ओबेन ईव्ही'ने(Oben EV) भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकलची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या या मोटारसायकलचे नाव 'ओबेन रोर'(Oben Ror) ठेवले आहे. विशेष म्हणजे ही बाईक फुल चार्जवर 200KM पर्यंतची रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. ही हायस्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकल पुढील महिन्यात भारतात लाँच केली जाईल आणि 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत त्याचे वितरण सुरू होईल.
ओबेन रोर इलेक्ट्रिक बाइकचे फीचर्स ओबेन EV ने त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकबद्दल जास्त तपशील उघड केलेले नाहीत. पण, एक्सप्रेस ड्राइव्हच्या रिपोर्टनुसार, ही हायस्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकल 100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते आणि फक्त 3 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. शिवाय, कंपनीचा दावा आहे की, ही बाईक सिंगल चार्जिंगवर 200 किमीची रेंज देते. विशेष म्हणजे, ही गाडी अवघ्या 2 तासात चार्ज होते.
किंमत काय असेल?
ही इलेक्ट्रिक मोटरसायकल तीन प्रकारात सादर केली जाईल. कंपनीने सध्या या बाईकची किंमत जाहीर केलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार किंमत 1 लाख ते 1.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. पुढील 2 वर्षांत दर 6 महिन्यांनी एक नवीन उत्पादन लाँच करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ओबेन इलेक्ट्रिकच्या सह-संस्थापक मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “ओबेन इलेक्ट्रिक बहु-स्तरीय चाचणी, टिकाऊपणा, सुरक्षितता आणि कनेक्टिव्हिटीसह सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास सज्ज आहे.