नवी दिल्ली - बीएमडब्ल्यू एक्स 3 आजपासून भारतीय बाजारांमध्ये उपलब्ध झाली आहे. दिल्लीमध्ये हे मॉडेल आज लॉन्च करण्यात आले आहे. 2018 BMW X3 या मॉडेलची भारतीय बाजारपेठेतील किंमत 49.99 लाखापासून सुरु होते. याचा टॉप एण्ड मॉडल एक्स-शोरूम किंमत 56.70 लाख रुपये आहे. 2018 BMW X3 दोन प्रकारात आहेत. ज्यात Expedition आणि Luxury Line चा समावेश आहे.
2018 BMW X3मध्ये किडनी ग्रिल, हेडलॅप क्लस्टर, फुल एलआयडी लावण्यात आले आहे. BMW X3 एसयूवीच्या फ्रंट बंपरमध्ये बदल करण्यात आला आहे. कारमध्ये 18 इंचाचे स्टँडर्ड एलॉय व्हील लावण्यात आले आहे. तर टॉप एण्ड वेरिएण्मध्ये 21 इंचाचे एलॉय व्हीलचा पर्याय उपलब्ध आहे. बीएमडब्ल्यूच्या गेल्या मॉडेलच्या तुलनेपेक्षा नवीन मॉडेल 55 किलो वजनाने हलका आहे.
2018 BMW X3 मध्ये 6th जेनेरेशन iDrive इंफोटेनमेंट सिस्टम लावण्यात आले आहे. ज्यामध्ये टचस्क्रीन, वॉयस कंट्रोलसोबत स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधा देण्यात आली आहे. 2018 BMW X3 मध्ये Harmon Kardon 600w ऑडियो सिस्टम, BMW कनेक्ट ड्राइव, ऑटोमेटिक डिफरेंशियल ब्रेक, डायनेमिक ट्रॅक्शन कंट्रोल, एडॅप्टिव सस्पेंशन, हिल स्टार्ट असिस्ट यासारखे फिचर दिलेले आहेत.
2018 BMW X3ची स्पर्धा Audi Q5, Mercedes-Benz GLC, Land Rover Discovery Sport आणि Volvo XC60 सोबत असणार आहे.