शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Porsche Taycan EV आणि Porsche Macan फेसलिफ्ट भारतात लाँच; प्रीमिअम फीचर्ससह येते लक्झरी कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 11:43 PM

Porsche Taycan EV या कारमध्ये सीटमध्ये मिळणार मसाज फीचर, पाहा किती आहे किंमत, काय आहेत फीचर्स.

भारतीय इलेक्ट्रीक कार मार्केटमध्ये आता एका जबरदस्त इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारची एन्ट्री झाली आहे. Porsche Taycan असं या कारचं नाव आहे. जर्मन लक्झरी ऑटोमेकरच्या या नव्या इलेक्ट्रीक कारची किंमत 1.5 कोटी रूपये इतकी आहे. ही कार Taycan Sports Saloon आणि Gran Turismo या दोन व्हेरिअंटमध्ये येते. ही कार पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ती 484 किमी पर्यंतची रेंज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

या कारचं डिझाईनदेखील अतिशय उत्तम आहे. याची स्लोपिंग रुफलाईन, स्कल्पटेड हुडसोबत इन्व्हर्टेड L शेप हेडलँप्स, रुंद ब्लॅक्ड आऊट एअर डॅम या कारचा लूक अधिक जबरदस्त बनवतो. कारच्या मागील बाजूला एलईडी टेललाईट देण्यात आले आहे. या कारमध्ये एक 3 स्टेट स्पॉयलर सिस्टम देण्यात आलं आहे. याच्याशिवाय मागील बाजूला तुम्हाला PORSCHE चा एक थ्रीडी लोगोही पाहायला मिळणार आहे. कारमध्ये कंपनी  B-पिलर, ड्यूल-टोन ORVMs, ऑटोमॅटिकली अॅक्सटेंडिंग डोर हँडल्स आणि डिझायनर व्हिल्सदेखील देत आहे. 

2.8 सेकंदात 100 किमीचा स्पीडही कार दोन इलेक्ट्रीक मोटर्ससह येते. यामध्ये 79.2kWh अथवा 93.4kWh बॅटरी पॅक देण्यात आला असून ही बॅटरी 751hp ची पॉवर जनरेट करते आणि याची रेंज 484 किमी इतकी आहे. Taycan Turbo S व्हेरिअंट 2.8 सेकंदात 0-100 kmph चा स्पीड पकडते.

लक्झरी केबिनकारच्या इंटीरियरबद्दल सांगायचं झालं तर, यात एक लक्झरीयस 4-सीटर केबिन आहे. कारमध्ये देण्यात आलेल्या सीट्स मसाज फंक्शनसह येतात. पॅनोरामिक सनरूफने सुसज्ज या कारमध्ये कंपनीनं 3-स्पोक मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील दिलं आहे. विशेष म्हणजे या कारमध्ये तुम्हाला 4-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देखील मिळणार आहे.

मल्टीपल एअरबॅग्स, ऑटो इमर्जन्सी ब्रेकया कारच्या डॅशबोर्डवर 8.4 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही अँड्रॉईड ऑटो प्ले आणि अॅपल कार प्लेला सपोर्ट करते, याशिवाय कारमध्ये 16.8 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रूमेंट कन्सोलही देण्यात आला आहे. या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं मल्टिपल एअबॅग्स आणि ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.

2021 Porsche Macan देखील लाँचनव्या लक्झरी इलेक्ट्रीक कारसोबत कंपनीनं 2021 2021 Porsche Macan देखील लाँच केलली आहे. या कारची सुरूवातीची किंमत 83.21 लाख रूपये आहे. या कारचं बेस व्हेरिअंट म्हणजेच Macan 2.0 लीटर इंजिनसह येतं. हे एक टर्बोचार्ज्ड इंजिन असून 400Nm च्या पीक टॉर्कसह 261bhp ची पॉवर जनरेट करतं.

टॅग्स :Porscheपोर्शेElectric Carइलेक्ट्रिक कार