शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

Renault Triber चं नवं व्हर्जन भारतात लाँच; केवळ साडेपाच लाखांत 7 सीटर कार, पाहा फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 10:11 PM

पाहा काय आहेत जबरदस्त फीचर्स आणि कोणते आहेत अन्य व्हेरिअंट

ठळक मुद्देचार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली कारया कारच्या बेस व्हेरिअंटची किंमत साडेपाच लाखांच्या जवळ आहे.

भारतीय बाजारपेठेत स्पेशियस आणि मोठ्या कार्सची बरीच मागणी असते. सद्यस्थितीत भारतीय बाजारपेठेत अशा अनेक कार्स उपलब्ध आहेत. परंतु फ्रान्सची वाहन उत्पादक कंपनी Renault नं आपल्या 7 सीटर कार Triber चं नवं व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केलं आहे. यापूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीनं कारमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक ठरते. या कारच्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 5.30 लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर या MPV मध्ये प्रोजेक्टर हेडलँप, LED डे टाइम रनिंग लाईट्स, 8.0 इंचाचा ट्चस्क्रिन एन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही सिस्टम अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोद्वारे कनेक्ट केली जाऊ शकते. तसंच तिन्ही रो मध्ये एसी वेंट्स, कुल्ड सेंटर बॉक्स, किलेस एंट्री, पुश बटन स्टॉर्ट/स्टॉप, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सर, पॉवर विंडो आणि रियर वॉश वायपर सारखेही फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच या कारमधील तिसऱ्या रोमधील सीट ही डिटॅचेबल आहे. या कारमध्ये कंपनीनं 1.0 लीटर क्षमतेचं 3 सिलिंडर असलेलं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. हे इंजिन 70bhp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करतं. तिसऱ्या रोमधील सीट या डिटॅचेबल आहेत. तसंच आवश्यकता नसल्यास त्या फोल्डही करता येतात. सीट फोल्ड केल्यास तुम्हाला 625 लीटरची बूट स्पेस मिळते. या कारच्या टॉप मॉडेलसह कंपनीनं 4 एअरबॅग्स, 8 इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहे. कोणते व्हेरिअंट आणि किती किंमत ?ही MPV एकूण चार रंगात उपलब्ध आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ व्हेरिअंट्सचा समावेश आहे. याच्या RXE व्हेरिअंटची किंमत 5.30 लाख रुपये, तर टॉप मॉडेल RXZ ची किंमत 7.65 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर RXL च्या मॅन्युअल व्हेरिअंटची किंमत 5.99 लाख रूपये आणि ऑटोमॅटिक व्हेरिअंटची किंमत 6.50 लाख रूपये आहे. याशिवाय RXT च्या मॅन्युअल मॉडेलसाठी 6.55 लाख आणि ऑटोमॅटिक व्हेरिअंटसाठी 7.05 लाख एक्स शोरुम किंमत मोजावी लागेल. 

टॅग्स :Renaultरेनॉल्टcarकारIndiaभारत