शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

Hyundai Tucson Launch: ह्युंदाईची नवी SUV लॉन्च, धडकण्यापूर्वी देईल वॉर्निंग, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 3:37 PM

ही SUV प्लॅटिनम आणि सिग्नेचर अशा दोन ट्रिममध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बाजारात या नव्या ट्युसॉनची स्पर्धा जीप कंपास, सिट्रोएन सी-5 एअरक्रॉस आणि फोक्सवॅगन टिगुआनसारख्या गाड्यांसोबत असेल.

ह्युंदाईने (Hyundai) भारतात आपली प्रीमियम SUV Hyundai Tucson लॉन्च केली आहे. हिची भारतातील एक्स-शोरूम किंमत 27.7 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र, अद्याप हिच्या इतर व्हेरिअंटच्या किंमतीसंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. हे या एसयूव्हीच्या चौथ्या जेनरेशनचे मॉडेल आहे.

ही SUV प्लॅटिनम आणि सिग्नेचर अशा दोन ट्रिममध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बाजारात या नव्या ट्युसॉनची स्पर्धा जीप कंपास, सिट्रोएन सी-5 एअरक्रॉस आणि फोक्सवॅगन टिगुआनसारख्या गाड्यांसोबत असेल. महत्वाचे म्हणजे ही एसयूव्ही ADAS लेव्हल 2 फीचर्ससह लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे ही कार धडक असण्याची शक्यता असल्यास आपल्याला वॉर्निंग देखील देईल.

Hyundai Tucson इंजिन -न्या Hyundai Tucson ला 2.0-लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आले आहे. 2.0 लिटरचे चार सिलिंडर इंजिन 156hp ची पॉवर आणि 192Nm एवढा टार्क जेनरेट करते. हे इंजिनला 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडण्यात आले आहे. तर दुसरे 2.0-लिटरचे डिझेल इंजिन 186hp आणि 416Nm एवढा टार्क जनरेट करते. ते 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने जोडले जाते.

लेव्हल-2 ADAS फीचर्स -ADAS फीचर्स असलेली ही भारतातील पहिली Hyundai कार आहे. ADAS लेव्हल 2 मध्ये आपल्याला फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, लेन किप असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट सारखे फीचर्स मिळतील. इतर सेफ्टी फीचर्समध्ये सहा एअरबॅग्स, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेंसर, ईएससी, हिल-डिसेंट कंट्रोल आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेकही देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारAutomobileवाहन