कावासाकी इंडियाने (Kawasaki India) देशात नवीन 2022 KLX450R डर्ट बाईक लाँच केली आहे. नवीन ऑफ-रोडर मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत ही बाईक मागील मॉडेलपेक्षा 50,000 रुपयांनी महाग झाली आहे.
डिलिव्हरी नवीन बाईकची डिलिव्हरी 2022 च्या पहिल्या महिन्यात सुरू होणार आहे. नवीन KLX450R आपल्या आधीच्या मॉडेलप्रमाणेच CBU (पूर्णपणे तयार केलेले युनिट) म्हणून भारतात येत आहे.
काय झाले बदल?वार्षिक अपडेटसह, कावासाकी KLX450R बाइक नवीन लाइम ग्रीन कलर ऑप्शनसह सादर करण्यात आली आहे. यासोबतच बाईकमध्ये नवीन डिकेल्स देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी लो-एंड टॉर्कसाठी पॉवरट्रेनमध्ये किरकोळ अपडेट देखील केले आहेत. बाईकसाठी केलेल्या इतर अपडेट्समध्ये सस्पेंशन देखील बदलले आहे.
इंजिन आणि पॉवरनवीन Kawasaki KLX450R ला पूर्वीप्रमाणेच 449cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन आता उत्तम लो-एंड टॉर्क देते आणि त्याच 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत येते. पॉवरट्रेन हलक्या वजनाच्या पॅरॉमीटर फ्रेममध्ये ठेवले आहे.
सस्पेंशनसस्पेंशनसाठी, बाईकच्या पुढच्या बाजूला अपसाइड-डाऊन फॉर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक आहे. ब्रेकिंगसाठी, दोन्ही बाजूंना पेटल-प्रकारचे डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहेत. बाइकला रेंटल अॅल्युमिनियम हँडलबार स्टँडर्ड आणि एक छोटा डिजिटल कन्सोल देखील मिळतो.
येणार तीन नवीन बाईकदरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कावासाकीने 2022 पूर्वी तीन नवीन इलेक्ट्रिक आणि हायब्रिड बाईक बाजारात आणण्याची आपली योजना जाहीर केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, 2035 पर्यंत त्यांची बहुतेक मॉडेल्स इलेक्ट्रिक आणि हायब्रिडवर स्विच करण्याची त्यांची योजना आहे.