जपानची दुचाकी वाहन उत्पादक कंपनी Kawasaki नं भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध स्पोर्ट्स बाईक Kawasaki Ninja 650 चं फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं. अतिशय आकर्षक लूक, डिझाईन आणि इंजिन क्षमतेसह येणाऱ्या बाईकची किंमत 6.61 लाख रूपये आहे. गेल्या काही मॉडेल्सच्या तुलनेत या बाईकची किंमत अधिक आहे.
मागील मॉडेलची किंमत 6.54 लाख रुपये आहे. कंपनीने हे नवीन मॉडेल गेल्या महिन्यातच जागतिक बाजारात सादर केले होते, ज्यात काही विशेष बदल करण्यात आले आहेत. नव्या कलर्ससह अपडेटेड फीचर्स या बाईकला अधिक खास बनवतात. यामध्ये सिग्नेचर लाईम ग्रीन पेंट सोबत लोअर फेयरिंगवर व्हाईट हायलाईट्स देण्यात आले आहे. शिवाय, बॉडीवर्कच्या सभोवतालचे लाल पिनस्ट्राइप ग्राफिक्स या बाईकला आणखी सुंदर बनवतात. Kawasaki Ninja 650 मध्ये पर्ल रोबोटिक व्हाईट कलरही मिळतो. याणध्ये व्हाईटसोबत मेटॅलिक ग्रे आणि लाईम ग्रीनही सामील आहे.
या बाईकमध्ये फुल-एलईडी हेडलँप आणि टेल लँपसह ब्लूटूथ कनेक्टिव्हीटीही देण्यात आली आहे. नव्या निंजामध्ये 4.3 इंचाचा फुल कलर टीएफटी डिस्प्लेही आहे. या बाईकच्या इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीनं यामध्ये 649cc पॅरलल ट्विन, लिक्विड कुल्ड इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 66.4bhp ची पॉवर आणि 64Nm चा टॉर्क जनरेट करतं.
सुरक्षेचीही काळजीकंपनीनं या बाईकमध्ये सुरक्षेचीही काळजी घेतली आहे. सस्पेन्शन ड्युटी म्हणून याच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूला एक मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आलं आहे. ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) असलेल्या या बाईकमध्ये पुढील बाजूला ट्विन डिस्क आणि मागील बाजूला एक सिंगल डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.