स्कोडा 2022 कोडियाक फेसलिफ्ट एसयूव्ही (Skoda 2022 Kodiaq) भारतात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही कार लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत त्याच्या सर्व युनिट्सची विक्री झाली. स्कोडा या कंपनीने सोमवारी भारतीय ग्राहकांसाठी सेकंड जनरेशन कोडियाक एसयूव्ही लाँच केली.
Skoda Kodiaq SUV च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 34.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी निश्चित करण्यात आली आहे. नवी कोडियाक एसयूव्ही यापूर्वी जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली होती. न्यू जनरेशन 7-सीटर एसयूव्हीमध्ये त्याच्या इंजिनसह त्याचं डिझाइनसह आणि अन्य टेक्निकल अपडेटही करण्यात आले आहे.
इंजिन क्षमताया कारमध्ये 2.0 लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 190PS ची पॉवर आणि 320Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 7 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतं. तसंच ही कार अवघ्या 7.8 सेकंदात 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे.
काय आहेत फीचर्स?या कारच्या फीचर्सबद्दल सांगायचं झाल्यास, नवीन कोडियाकमध्ये क्रोम फिनिशसह हेक्सागोनल ग्रिल देण्यात आलं आहे. बॉडी कलर्ड बंपर आणि त्याच्या पुढच्या ग्रिलमध्येही किरकोळ डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत. कारच्या रिअरमध्ये आकर्षक टर्न इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हील आणि सिल्व्हर कलरमध्ये फंक्शनल रूफ रेलसह, नवीन कोडियाक खूपच स्पोर्टी दिसते.
Skoda Kodiaq मध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलं आहे. यामध्ये इनबिल्ट नेव्हिगेशन आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीही देण्यात आलं आहे. या कारमध्ये एकदम नव्या प्रकारे केबिन डिझाइन करण्यात आलं आहे. तसंच स्टिअरिंग व्हिलचंही नवं डिझाइन देण्यात आलंय. याशिवाय यात अॅम्बिअन्ट लायटिंग, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड पॅनोरमिक सनरुफसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.