नवी दिल्ली : जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने (BMW) नवीन BMW XM एसयूव्ही लाँच केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी एसयूव्हीची कॉन्सेप्ट व्हर्जन दाखवली होती. ही कार खास डिझाइन आणि माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीसह येते. कारचे पेट्रोल इंजिनही खूप पॉवरफुल आहे. विशेष म्हणजे, कार 85 किमीपर्यंत फक्त बॅटरीद्वारे चालवता येते. कारचा टॉप स्पीड देखील 250kmph पर्यंत आहे.
डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, समोर एक मोठी किडनी ग्रिल आणि स्लीक एलईडी डेटाइम रनिंग लॅम्पसह हेडलॅम्प्स आहेत. समोरच्या बंपरमध्ये मोठे एअर इनटेक्स देण्यात आले आहे. कारमध्ये सँडर्ड म्हणून 23-इंचाचे व्हील देण्यात आले आहेत, तर 22-इंचाच्या व्हीलचा देखील ऑप्शन देण्यात आला आहे. मागील बाजूस, एलईडी टेललाइट्स आणि मोठ्या डिफ्यूझरसह क्वाड एक्झॉस्ट सेटअप आहे.
आतील बाजूस एसयूव्हीमध्ये ड्युअल-टोन थीमसह येते, ज्यामध्ये लेदरचा वापर केला गेला आहे. हेडलाइनरमध्ये 100 एलईडी आहेत. याशिवाय, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, iDrive 8 सॉफ्टवेअरसह मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट हेड-युनिट, हेड्स-अप डिस्प्ले, ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
XM प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेनसह ऑफर केले आहे. यामध्ये 4.4-लिटर V8 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इलेक्ट्रिक मोटरसह एकत्रितपणे 644 Bhp आणि 800 Nm जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीच्या मते, कार 4.3 सेकंदात 0 - 100kmph चा वेग गाठू शकते आणि कारचा टॉप स्पीड 250 kmph आहे. कारमध्ये 25.7 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे फक्त इलेक्ट्रिक मोडवर 140 किमी/तासच्या टॉप गतीसह जवळपास 85 किमी चालते.