नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत हिरो ग्लॅमर (Hero Glamour) बाईकचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. ही बाईक ग्राहकांना ड्रम आणि डिस्क या दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल. हिरो मोटोकॉर्पची ही बाईक आधीपेक्षा किती बदलली आहे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या...
या बाईकमध्ये नवीन बदलाबद्दल बोलायचे झाल्यास आता इंजिन OBD2 कॉम्प्लायंट झाले असून बाईक E20 इंधनावरही धावू शकणार आहे. एवढेच नाही तर आता तुम्हाला या बाईकमध्ये स्ट्राइप्ससह अपडेटेड ग्राफिक्स पाहायला मिळतील. याशिवाय, एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, ज्यावर तुम्हाला रियल टाइम मायलेज आणि कमी इंधन इंडिकेटर यांसारखी अनेक महत्त्वाची माहिती मिळेल. तसेच, मोबाईल चार्ज करण्यासाठी यूएसबी (USB) पोर्ट देण्यात आला आहे.
किंमत किती?हिरो मोटोकॉर्पच्या या बाईकचे अपडेटेड व्हर्जन 82 हजार 348 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आले आहे. या किमतीत तुम्हाला या बाईकचे ड्रम व्हेरिएंट मिळेल. याचबरोबर, या बाईकच्या डिस्क व्हेरिएंटची किंमत 86 हजार 348 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
नवीन कलर ऑप्शनहिरो मोटोकॉर्पने Glamour 2023 मॉडेलसाठी नवीन कलर ऑप्शन आणले केले आहेत, ज्यात Candy Blazing Red, Techno Blue-Black आणि Sports Red-Black यांचा समावेश आहे.
इंजिन आणि मायलेजया हिरो बाईकमध्ये तुम्हाला 125 cc सिंगल सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन मिळेल, जे 7500rpm वर 10.68 bhp पॉवर आणि 6000 rpm वर 10.6 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन आता OBD2 कंप्लायंट आहे आणि बाईक आता E20 इंधनावर देखील चालू शकते. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 63 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.
बाईकची स्पर्धा कोणासोबत?या किमतीच्या रेंजमध्ये Hero Glamour ची बाजारात थेट स्पर्धा टीव्हीएस कंपनीच्या TVS Raider 125, Bajaj Pulsar 125 आणि होंडाची Honda Shine यांच्याशी आहे.