New Honda CB300R Launch: भारतातील दिग्गज टू-व्हिलर कंपनी Honda Motorcycle & Scooter India ने नवीन 2023 CB300R निओ स्पोर्ट्स कॅफे रोडस्टर लॉन्च केली आहे. 2.40 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीची 2023 Honda CB300R Bigwing डीलरशिप नेटवर्कवर बुकिंगसाठी उपलब्ध आहे. पर्ल स्पार्टन रेड आणि मॅट मॅसिव्ह ग्रे मेटॅलिक, या दोन रंगांमध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. 2023 Honda CB300R रेट्रो-थीम असलेल्या CB1000R लिटर-क्लास रोडस्टरपासून प्रेरित आहे.
डिझाइन आणि हार्डवेअर
निओ स्पोर्ट्स कॅफे मस्क्यूलर इंधन टाकी आणि मजबूत अपस्वेप्ट एक्झॉस्टसह येते. बाईकमध्ये गोल आकाराचे एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लॅम्प देण्यात आले आहेत. यात पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. यात आता इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि हजार्ड लाईट स्विच देखील दिला आहे. बाईखचे वजन 146 किलोग्रॅम आहे, ज्यामुळे ही या श्रेणीतील सर्वात हलकी बाईक आहे.
सस्पेंशनसाठी बाईकमध्ये 41 मिमी USD फ्रंट फोर्क्स आणि मागील चाकामध्ये अॅडजस्टेबल मोनोशॉक मिळेल. ब्रेकिंगसाठी समोर 296 mm डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल ABS सह मागील बाजूस 220 mm डिस्क ब्रेक आहे.
2023 होंडा CB300R इंजिन
2023 Honda CB300R मध्ये 286.01cc, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर BSVI, OBD2A, PGM-FI इंजिन आहे. हे इंजिन 30.7bhp आणि 27.5Nm जनरेट करण्यास सक्षम आहे. पॉवरट्रेन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. मोटारसायकलमध्ये असिस्ट स्लिपर क्लच देखील आहे, ज्यामुळे गीअरशिफ्ट करणे सोपे होते.