शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

2023 Honda Livo: शानदार लूकसह 2023 होंडा लिवो लाँच, किंमत 78,500 रुपयांपासून सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 2:55 PM

कंपनी होंडा अपडेटेड Livo वर 10 वर्षांचे वॉरंटी पॅकेज (3 वर्षांचे स्टँडर्ड +7 वर्ष ऑप्शनल एक्सटेंडेड वॉरंटी) देत आहे.

नवी दिल्ली : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने आपली अपडेटेड 2023 लिवो (2023 Livo) बाईक भारतात लॉन्च केली आहे. या बाईकची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 78,500 रुपयांपासून सुरू होते. नवीन अपडेटसह Livo आता OBD2 अनुरूप आहे. ही एंट्री-लेव्हल कम्युटर मोटरसायकल ड्रम आणि डिस्क या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 82,500 रुपये आहे. 

कंपनी होंडा अपडेटेड Livo वर 10 वर्षांचे वॉरंटी पॅकेज (3 वर्षांचे स्टँडर्ड +7 वर्ष ऑप्शनल एक्सटेंडेड वॉरंटी) देत आहे. 2023 Livo ची संपूर्ण डिझाईन नवीन ग्राफिक्स, अॅडव्हान्स आणि रिडिझाइन्ड केलेले फ्रंट व्हिझर आणि टेललाईट्ससह बदलण्यात आली आहे. ही बाईक तीन कलर ऑप्शनमध्ये आणली आहे. या बाईकमध्ये अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक, मॅट क्रस्ट मेटॅलिक आणि ब्लॅक या कलरचा समावेश आहे. तसेच, Livo ला 'अर्बन स्टाईल' देण्यासाठी होंडाने हे अपडेट दिले आहे. 

बाईकच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, स्क्यूलर फ्युएल टँक आणि एकूणच स्टाईलमुळे बाईकला स्पोर्टी लूक मिळतो. यात ट्यूबलेस टायर्ससह 18-इंच अलॉय व्हील, एक DC हॅलोजन हेडलॅम्प, 657 मिमी उंच सीट, इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, 5-स्टेप प्रीलोड अॅडजस्टेबल रीअर शॉक ऍब्जॉर्बर्स, RSU टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि कॉम्बी ब्रेक सिस्टम मिळते.

पॉवरसाठी Livo मध्ये 109.51cc सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 8.67 bhp पॉवर आणि 9.30 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 4-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. OBD2 सह, या इंजिनला आता सायलेंट इंजिन सुरू करण्यासाठी ACG स्टार्टर देण्यात आला आहे. ब्रशलेस मोटर जनरेटर म्हणूनही काम करते, जी वीज निर्माण करण्यासाठी आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरली जाते.

दरम्यान, 2015 मध्ये लाँच झाल्यापासून Livo आपल्या सेगमेंटमधील खरेदीदारांच्या पसंतीस उतरली आहे आणि OBD2 च्या नियमांनुसार या बाईकमध्ये बदल करण्यासोबत आम्ही त्याचे आकर्षण वाढवत आहोत. नवीन अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेली 2023 Honda Livo स्टाइल, कंफर्ट आणि परफॉर्मेंससह ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे सुरूच ठेवले आहे, असे या बाईकच्या लॉंचिंग प्रसंगी कंपनीचे सेल्स आणि मार्केटिंग संचालक योगेश माथूर म्हणाले.

या बाईकची कोणाशी स्पर्धा करणार?ही बाईक TVS Radeon आणि Hero Passion Pro सारख्या बाईकशी स्पर्धा करू शकते. यामध्ये 109cc सिंगल सिलिंडर BS6 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या बाईकची  एक्स-शोरूम किंमत 73 हजार रुपयांपासून सुरू होते.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन