हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आज अपला एसयूव्हीचा ताफा अपडेट करत नवी Hyundai Creta बाजारात उतरवली आहे. या SUV मध्ये कंपनीने काही नवीन सेफ्टी फीचर्स देखील समाविष्ट केले आहेत, यामुळे ही एसयूव्ही आता पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षिता प्रदान करेल. याच बरोबर नव्या अपडेट्समुळे ही SUV आता पूर्वीपेक्षाही अधिक महाग झाली आहे.
हिच्या एंट्री लेव्हल व्हेरिअंटची किंमत 10.84 लाख रुपये, तर टॉप मॉडेलची किंमत 19.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, हिच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 20,000 रुपये आणि डिझेल व्हेरिअंटची किंमत 45,000 रुपयांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
कंपनीने Hyundai Creta मध्ये केवळ काही नवीन फीचर्सचा समावेश केला आहे, या व्यतिरिक्त या SUV मध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. ही पाच-सीटर एसयूव्ही पूर्वी प्रमाणेच 1.5-लीटर चार-सिलिंडर पेट्रोल इंजिन (115 पीएस आणि 144 एनएम टॉर्क), 1.5-लीटर नॅच्युरल एस्पायर्ड चार-सिलेंडर डिझेल (115 पीएस आणि 250 एनएम टॉर्क) आणि 1.4-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (140 K पॉवर आणि 242 Nm टॉर्क) पर्यायासह येतो.
नव्या Hyundai Creta सोबत देण्यात आलेले फीचर्स - 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेहिकल स्टॅबिलिटी मॅनॅजमेंट (VSM), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), रिअर डिस्क ब्रेक, सीटबेल्ट हाईट एड्जेस्टमेंट, ISOFIX चाइल्ड अँकर