नवी दिल्ली-
दक्षिण कोरियाची कार निर्माती कंपनी Kia नं भारतीय बाजारात आपली स्वस्त आणि मस्त SUV कार Kia Sonet चं नवं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनच्या क्षमतेसह सज्ज असलेली ही नवी 2023 Kia Sonet मध्ये केवळ अपडेटेड इंजिनच नव्हे, तर किंमतही बदलली आहे. नव्या किया सोनेट एसयूव्ही कारची किंमत ७.७९ लाखांपासून सुरू होते तर टॉप व्हेरिअंटची GT लाइनसाठी १३.०९ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार अपडेटेड एसयूव्हीचं इंजिन नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन अंतर्गत तयार करण्यात आली आहे. जे नियम येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.
Kia Sonet मध्ये काही नवे फिचर्स देखील पाहायला मिळणार आहेत. यामुळे मागील दोन मॉडलच्या तुलनेत नवी कार हटके आणि वेगळी ठरते. नवे फिचर्स आणि इंजिन अपडेटमुळे या कारची किंमत जवळपास ५० हजारांहून अधिक असणार आहे. नव्या किया सोनेटमध्ये कंपनीनं BS6 2 कंप्लाइंट, १.२ लीटरची क्षमतेचं नॅच्युरल एस्पिरेडेट पेट्रोल इंजिन वापर करण्यात आला आहे. जे फाइव्ह-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गियरबॉक्ससह उपलब्ध आहे.
यात १.० लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह सीक्स-स्पीड iMT किंवा सेव्हन-स्पीड DCT सह जोडण्यात आल्या आहेत. तसंच डिझेल इंजिन पर्यायात १.५ लीटर इंजिन देण्यात आलं आहे. ते ६-स्पीड ऑटोमॅटीक आणि ६-स्पीड iMT गियरबॉक्स देण्यात आलं आहे.
अपडेटेड फिचर्सफिचर्सच्या बाबतीत या एसयूव्ही कारच्या सर्व व्हेरिअंटमध्ये नेविगेशनसह १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट स्क्रीन, ४.२ इंचाचा कलर इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, वेंटिलेडेट फ्रंट सीट्स, एलईडी मूड लाइट्ससह बोस प्रीमियम साऊंट सिस्टम तसंच टर्बो डीसीटी व्हेरिअंट्ससाठी पॅडल शिफ्टर्स देण्यात आले आहेत.