नवी दिल्ली : जगप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘बीएमडब्ल्यू’ने भारतात तब्बल १ हजार सीसी क्षमतेची नवी स्पोर्टस् बाइक आणण्याची तयारी केली आहे. ‘बीएमडब्ल्यू एस १००० आरआर’ या नावाची ही बाइक येत्या १० डिसेंबर रोजी भारतीय बाजारात उतरविली जाणार आहे. तीची किंमत १९ ते २३ लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये या बाइकचा ग्लोबल डेब्यू आला होता.
बाइकची वैशिष्ट्ये- बाइकमध्ये ९९९ सीसीचे लिक्विड कूल्ड, ४-सिलिंडरयुक्त इंजिन असेल.- २०६.५ बीएचपी कमाल पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क- जुन्या मॉडेलपेक्षा ३ बीएचपींनी ताकद वाढली आहे. - इंजिन १४,६०० आरपीएम, ६ स्पीड गीअरबॉक्स. १,४५७ मिमी व्हील बेस - ॲडजस्ट फंक्शनमुळे छोट्या स्वारांसाठी बाइकची उंची कमी होईल