नवी दिल्ली : भारतीय ऑटो मार्केटमध्ये गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये 350 सीसी बाइकच्या विक्रीत तब्बल 54.47 टक्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये टॉप 6 विकल्या गेलेल्या 350cc मॉडेल्सची एकूण विक्री 64,397 युनिट्स होती, जी नोव्हेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 41,688 युनिट्सपेक्षा 22,709 युनिट्स जास्त आहे. रॉयल एनफील्ड या सेगमेंटमध्ये सर्वात लोकप्रिय आहे आणि कंपनीची एक बाइक अशी आहे, ज्याची बुलेट देखील विक्रीच्या बाबतीत अपयशी ठरली आहे. दरम्यान, 350 सीसीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या टॉप 5 बाइक्सबद्दल जाणून घ्या...
रॉयल इनफिल्डची क्लासिक 350 (Royal Enfield classic 350) ही या सेगमेंटमधील आणि कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याची 26,702 युनिट्सची विक्री झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 19,601 युनिटच्या तुलनेत हे प्रमाण 36.23 टक्क्यांनी वाढले आहे. एकूण 350cc बाइकच्या यादीत RE क्लासिक नवव्या स्थानावर आहे.
नोव्हेंबरमध्ये 15,588 युनिट्ससह हंटर 350 (Hunter 350)ही या सेगमेंटमधील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. रॉयल इनफिल्डचे लोकप्रिय मॉडेल बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 8,211 युनिट्सची विक्री केली आहे. क्लासिक 350 शी तुलना केल्यास, बुलेट 350 च्या तुलनेत तिप्पट विक्री झाली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बुलेट 350 च्या 8,733 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच या बाइकच्या विक्रीत 6 टक्क्यांची घट झाली आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानाबद्दल बोलायचे तर, येथे मेटेओर 350 ( Meteor 350) आणि इलेक्ट्रा 350 (Electra 350) ने कब्जा केला आहे. या दोन्ही बाइक्सची अनुक्रमे 7,694 युनिट्स आणि 4,170 युनिट्सची विक्री झाली आहे. होंडाच्या CB 350 ने 350cc सेगमेंटमध्ये सहावे स्थान मिळवले, ज्याने नोव्हेंबर 2022 मध्ये 2,032 युनिट्सची विक्री केली.