शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

राज्यातील ५१ हजार वाहनांचा विमा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 6:22 AM

वर्षभरातील आकडेवारी । परवाना रद्द करा, महामार्ग पोलिसांची शिफारस

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात गेल्या वर्षी ५१ हजार वाहनांनी विमा उतरविला नसल्याचे समोर आले आहे. यापैकी ५१ हजार वाहनांचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस महामार्ग पोलिसांनी आरटीओ विभागाला केली आहे.महामार्ग पोलिसांनी २०१९ मध्ये केलेल्या कारवाईत विमा न काढलेली ९,२४,१७० वाहने आढळली होती. परंतु पोलिसांनी समज दिल्यानंतर ८७३०४६ वाहनांनी विमा काढला परंतु सूचना देऊनही विमा न काढणाऱ्या ५११२४ वाहनांचा विमा रद्द करण्यात आला आहे.२०१९ मध्ये केलेल्या कारवाईत राज्यात गेल्या वर्षी ५१ हजार वाहनांनी विमा उतरविला नसल्याचे उघडकीस आले. यामध्ये ५१ हजार वाहनांचा परवाना रद्द करावा अशी शिफारस महामार्ग पोलिसांनी आरटीओ विभागाला केला. थर्ड पार्टी विमा न उतरवणारी १८,६०५ वाहने आढळली. यापैकी ७,६६१ वाहने ताब्यात घेतली. वाहने ताब्यात घेतल्यानंतर ७,५८२ वाहनांनी विमा उतरविल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.अपघातात बळी वा जखमी झालेल्यांच्या वारसदारांकडून मागण्यात येणाºया नुकसानभरपाईस मर्यादा नाही. वय, उत्पन्न, मृत व्यक्तीवर अवलंबून असलेले कुटुंब आणि घडलेल्या अपघाताचे स्वरूप यावर नुकसानभरपाई अवलंबून असते. वाहनांचे रजिस्ट्रेशन झाल्यापासून जशी वर्षे पुढेजातात तसे वाहनाचे मूल्य कमी होत जाते. काही वर्षांनंतर वाहन विमा उतरवता येत नाही. त्यामुळे वेळीच विमा काढण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे.वाहन विमाकशासाठी?कार, ट्रक, मोटारसायकल व इतर वाहनांच्या संरक्षणासाठी वाहन विमा असतो. या विम्याचा प्राथमिक उद्देश हा रहदारीच्या अपघातांपासून होणारे वाहनाचे नुकसान, तसेच वाहनचालकाला अपघात झाल्यास सुरक्षा पुरवणे हा आहे.