भारतात ज्या पद्धतीने एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. तस-तशी टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझाची विक्रीही वाढताना दिसत आहे. दर महिन्याला सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीच्या यादीत यांपैकी कुठलीही एक कार पहिल्या क्रमांकावर असते. मात्र यातच, आता एक 6 लाख रुपयांची स्वस्तातली एसयूव्ही Brezza आणि Nexon साठी दोका ठरताना दिसत आहे. खरे तर, काही दिवसांतच या कारने विक्रीचा विक्रम केला आहे.
या ठिकाणी आम्ही ज्या एसयूव्हीसंदर्भात बोलत आहोत, ती एसयूव्ही म्हणजे Tata Punch. या एसयूव्हीने नुकताच 1.75 लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, ही टाटा मोटर्सची दुसरी सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. ही कार दर महिन्याला टॉप 10 कारच्या लिस्टमध्ये आसते. फेब्रुवारी महिन्यात हिच्या 11,169 युनिट्सची विक्री झाली.
किंमत आणि व्हेरिअंट - Tata Punch मायक्रो एसयूव्हीची किंमत 6 लाख रुपयांपासून 9.47 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. ही कार Pure, Adventurous, Accomplished आणि Creative अशा चार ट्रिम्समध्ये विकली जाते. या कारमध्ये जास्तीत जास्त 5 लोक बसू शकतात. या मायक्रो एसयूव्हीमध्ये 366 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तसेच हिचा ग्राउंड क्लिअरन्स 187mm एवढा आहे.
इंजिन आणि ट्रान्समिशन - टाटा पंच मध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन (86पीएस/113एनएम) मिळते. जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटीने सुसज्ज आहे. लवकरच हिचे सीएनजी व्हेरिंअंटही येत आहे. CNG व्हेरिअंट 77PS आणि 97Nm टार्क जनरेट करेल.