मुंबई - भारतामध्ये १० पैकी ७ प्रवासी हे वाहनाच्या मागच्या सीटवरून प्रवास करताना कधीही सीटबेल्ट बांधत नाहीत. एका सर्व्हेमधून याबाबतची माहिती समोर आली आहे. सर्व्हेमध्ये १० हजारांहून अधिक लोकांना सिटबेल्ट वापरण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले, यामधील २६ टक्के लोकांनी सांगितलं की, ते मागच्या सीटवर बसून प्रवास करत असताना कधीही सिट बेल्ट वापरत नाहीत.
रविवारी टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या अपघाताचा तपास करत असताना त्यांनी सिट बेल्ट लावली नसल्याचे निष्पन्न झाले होते. सायरस मिस्त्री कारच्या मागच्या सिटवर बसून प्रवास करत होते. त्यांच्यासोबत प्रवास करत असलेल्या पुढे बसलेल्या ड्रायव्हरसह दोघांनीही सिट बेल्ट बांधली होती. या अपघातामध्ये त्यांचे प्राण बालंबाल बचावले. मात्र मागच्या सिटवर बसलेले सायरस मिस्री आणि जहांगिर पंडोल यांचा मृत्यू झाला. या दोघांनीही सीट बेल्ट बांधली नव्हती.
सीट बेल्ट हे कारसेप्टीच्या बेसिक फीचर्सपैकी एक आहेत. अनेक देशांमध्ये ड्रायव्हर आणि सर्व प्रवाशांसाठी सिट बेल्ट वापरणं आवश्यक आहे. त्यासाठी कायदे बनवण्यात आले आहेत. एअरबॅगची डिझाइन पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी करण्यात आली आहे.
सीटबेल्ट आणि एअरबॅग एकत्र काम करतात. भारतामध्ये बहुतांश कार ट्विन एअरबॅग आणि सर्व सीटवर सीटबेल्टसह येतात. सीटबेल्ट आणि एअरबॅग अपघातादरम्यान प्राण वाचवण्यासाठी मिळून काम करतात. सीटबेल्ट लावल्या नाहीत तरी एअरबॅग काम करतात. मात्र कारमध्ये जिथे एअरबॅग लावलेल्या असतात तिथे एसआरएस लिहिलेले असते. त्याचा अर्थ Supplementary Restraining System असा होतो. म्हणजेच हे कारमधील प्राण वाचवणारे एकमेव साधन नाही आहे.
एअर बॅग अनेक सेंसरने कंट्रोल होते. यामध्ये इम्पॅक्ट सेंसर, प्रेशर सेंसर, ब्रेक प्रेशर सेंसर यांचा समावेश होते. सीट बेल्ट आणि एअरबॅगमध्ये कुठलेही इलेक्ट्रॉनिक कनेक्शन नाही आहे. मात्र अपघातादरम्यान, एअरबॅग तुमची छाती, चेहरा आणि डोक्याची सुरक्षा करते. तर सीट बेल्ट तुम्हाला जोराचा धक्का बसला तरी तुमचे शरीर स्थिर ठेवण्यास मदत करते.