नवी दिल्ली : जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्हाला एकत्र कुठेही जायचे असेल तर अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे एक मोठी 7 सीटर कार असावी, ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंबासह प्रवासाचा आनंद घेऊ शकता. देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांचे कुटुंब मोठे आहे आणि त्यांना 7 सीटर कार खरेदी करायची आहे. मात्र, कमी बजेट असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. तुम्हालाही असेच वाटत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण, मार्केटमध्ये अशा अनेक 7 सीटर कार आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे. तसेच, या कारमध्ये जबरदस्त मायलेजही मिळतो. या कारबद्दल जाणून घेऊया...
मारुती सुझुकी इको मारुतीची ही कार 5-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ही भारतातील सर्वात परवडणारी 7 सीटर कार आहे. त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर धावू शकते. तर त्याचे कमाल मायलेज 26 किमी प्रति किलो आहे. या कारच्या 5-सीटर व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 5.10 लाख रुपये आहे. तर त्याच्या 7-सीटर व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 5.42 लाख रुपयांपासून सुरू होते.
रेनॉल्ट ट्राइबररेनॉल्टची ही एमपीव्ही कार देशात खूप लोकप्रिय आहे. कारला 1.0 लीटर 3 सिलिंडर, Natural Aspirated पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 72 पीएस पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 6-वे अॅडजस्टेड ड्रायव्हर सीट, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ही फीचर्स आहेत. यासोबतच या कारमध्ये 84 लीटर बूट स्पेसही देण्यात आली आहे. या 7 सीटर कारची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी एर्टिगामारुती सुझुकीची एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कारपैकी एक आहे. या कारमध्ये माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज 1.5 लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. यात पेट्रोलसोबत सीएनजीचाही पर्याय आहे. हे इंजिन 103 PS पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार सीएनजीवर 26 किमी प्रति किलो मायलेज देते. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 8.41 लाख रुपये आहे.