शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

700km ची रेंज, या इलेक्ट्रिक कारसमोर टेस्लाही फेल; 8 दिवसांत भारत होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 12:49 PM

सिंगल चार्जवर हिची रेंज 700km पर्यंत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

चिनी कंपनी BYD (Build Your Dreams) ऑटो एक्सपो 2023 मध्ये मोठा धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. या कंपनीने भारतीय बाजारात यापूर्वीच आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. आता 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इव्हेंटमध्ये ही कंपनी काही नवे मॉडेल्स देखील शोकेस करणार आहे. यात BYD सील (Seal) सेडानचाही समावेश आहे. ही कार सादर करण्याची ही पहिलीच वेळ असेल. ही कार भारता शिवाय इतर काही देशांत लॉन्च करण्यात आली आहे. युरोपात आणि चीनमध्ये हीचा थेट टेस्ला मॉडेल-3 सोबत हीचा सामना होत आहे. हिचे डिझाईन ओशनने इन्सपायर्ड आहे. सिंगल चार्जवर हिची रेंज 700km पर्यंत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

BYD सीलचा बॅटरी पॅक आणि रेंज -BYD ने आपल्या या इलेक्ट्रिक सेडान सीलमध्येही ब्लेड बॅटरी टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. या कारमध्ये दोन बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. यात पहिले इंजिन 61.4kWh युनिट आणि दुसरे इंजिन 82.5kWh युनिट पॅक असेल. 61.4kWh युनिट बॅटरी पॅकमुळे कारलाची रेंज 550km असेल. तसेच, 82.5kWh युनिट पॅक सह कारची रेंज 700km पर्यंत असेल. एवढेच नाही तर कंपनी या कारसोबत 110kW ते 150kW पर्यंतचे बॅटरी ऑप्शनही देऊ शकते. यात डुअल मोटर सेटअपही देण्यात आले आहे. ही कार केवळ 3.8 सेकेंदांत 0-100kmphची स्पीड घेते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

BYD सीलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशंस -BYD सीलमध्येही सेंटर कंसोलमध्ये रोटेटिंग, 15.6-इंचांचा इंफोटेनमेंट डिस्प्लेही मिळतो. यात ड्रायव्हरला 10.25-इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि हेड-अप डिस्प्लेही मिळेल. फ्लोटिंग टचस्क्रीनला सेंट्रल AC व्हेंट्सद्वारे ड्राइव्ह सेलेक्टर आणि स्क्रॉल व्हीलसह खालच्या बाजूस विविध ड्राइव्ह मोड्स निवडण्यासाठी फ्लँक करण्यात आले आहे. सेंटर कंसोलमध्ये हिटेड विंडस्क्रीन, ऑडियो सिस्टिमसाठी व्हॉल्यूम कंट्रोलसह दोन वायरलेस चार्जिंग पॅड सारखे अॅडव्हॉन्स फीचर्स देखील मिळू शकतात. 

याशिवाय, कूपसारखे ऑल ग्लास रुफ, फ्लश फिटिंग डोअर हँडल, चार बूमरँग शेप्ड LED डे-टाइम रनिंग लाइट्स, स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन आणि रिअरमध्ये एक पुर्णपणे रुंद LED लाईट बार मिळेल. असे अनेक फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत. या कारच्या किंमतीसंदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, हिची एक्स-शोरूम किंमत 60 लाख रुपयांच्या जवळपास  असेल, असे मानले जात आहे. 

टॅग्स :Automobileवाहनauto expoऑटो एक्स्पो 2020chinaचीनTeslaटेस्ला