नवी दिल्ली - ९० च्या दशकामध्ये टू व्हीलर मार्केटचा बादशाह म्हणून आपला दबदबा निर्माण कऱणारी एलएमएल कंपनी अचानक बाजारातून गायब झाली होती. टू स्ट्रोक स्कूटर ऑब्सलिट झाल्याने आणि बजेटमधील दुचाकींच मार्केट वाढल्याने एलएमएल या स्पर्धेत मागे पडली. या कंपनीचं प्रख्यात मॉडेल असलेले वेस्पा बंद केल्यानंतर आणि एलएमएलने मोटरसायकलच्या मार्केटमध्येही हात आजमावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच दोन मोटारसायकल लॉन्चही केल्या होत्या. मात्र लोकांना त्या आवडल्या नाहीत. हळहळू ही कंपनी बाजारातून गायब झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा एलएमएल बाजारात धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी तयार झाली आहे.
भारतीय मार्केटमध्ये पुन्हा आपले हातपाय पसरवण्यासाठी एलएमएलने यावेळी इलेक्ट्रिक कंपनी ईरॉतिटसोबरत कोलोब्रेशन केलं आहे. त्याबरोबरच कंपनी आता प्रीमियम ई बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ही एक हायपर बाईक असेल.
कंपनी ही मोटारसायकल जानेवारी २०२३ मध्ये लॉन्च करण्याच्या विचारात आहे. यादरम्यान, तिची डिलिव्हरीही सुरू केली जाईल. तसेच यादरम्यान, कंपनी एक ई स्कूटरसुद्धा लॉन्च करणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी २०२३ मध्ये ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल.
मार्केटमधील पुनरागमनानंतर एलएमएलचा पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी बजाजसोबत सामना होण्याची शक्यता आहे. तर ओला, एथर, सिंपल आणि टीव्हीएस हेसुद्धा एलएमएलसमोर कडवे आव्हान उभे करतील. मात्र स्कूटरच्या बाजारात एलएमएलवर भारतीय बाजाराचा जुना विश्वास आहे. त्याचा फायदा या कंपनीला होऊ शकतो.