शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नव्या Maruti Alto K10 वर बम्पर डिस्काउंट, पण या महिन्यात खरेदी केली तरच मिळेल सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 10:28 AM

आता वर्षाच्या अखेरीस कंपनीकडून नवी मारुती ऑल्टो के10 वर 50,000 रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.

मारुती सुझुकीने ऑगस्त 2022 मध्ये देशातील तिसऱ्या पिढीची ऑल्टो के-10 बाजारात आणली आहे. ही एंट्री-लेव्हल हॅचबॅकला STD, LXi, VXi आणि VXi+ या चार ट्रिम्समध्ये आणली आहे. हिचे एकूण 6 व्हेरिअंट आहेत. या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 5.84 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम). आता वर्षाच्या अखेरीस कंपनीकडून नवी मारुती ऑल्टो के10 वर 50,000 रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. ग्राहक हिच्या मॅनुअल व्हेरिअंटवर  50,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकतात. यात रोख सूट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट लाभाचा समावेश आहे.

ऑल्टो के-10 एलएक्सआय (एमटी), वीएक्सआय (एमटी) आणि व्हीएक्सआय+ एमटीवर अनुक्रमे, 30,000 रुपये, 25,000 रुपये आणि 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळेल. या कारवर 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफरही मिळेल. एएमटी व्हेरिअंटवर केवळ 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ मिळत आहे. ऑल्टो के10 एएमटी व्हेरिअंट्सवर कुठल्याही प्रकारची सूट नाही.

याशिवाय, मारुती ऑल्टो 800 वरही ऑफर्स आहेत. या कारवर 34,000 रुपयांचे बेनिफिट्स ऑफर करण्यात येत आहेत. यात, 15,000 रुपयांची रोख सूट 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.

हार्टटेक प्लॅटफॉर्मवर बेस्ड नव्या मारुती ऑल्टो के-10 मध्ये 1.0 लीटर, 3-सिलेंडर के10सी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 5-स्पीड मॅनुअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्स (ऑप्शनल) सह ऑफर केले जाते. हे इंजिन 67bhp पॉवर आणि 89Nm टार्क जनरेट करते. यात डुअलजेट तंत्रज्ञान आणि आयडल स्टार्ट/स्टॉप सिस्टिम मिळते. या शिवाय, कारमध्ये ऑल्टो800 पेक्षा अधिक फीचर्स आहेत. या कारमध्ये स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्सदेखील देण्यात आले आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहनcarकार