पैशाचा असमतोल कार असतो ते या उदाहरणावरून समजेल. अनेक जण छोटीशी का होईना कार हवी म्हणून स्वप्ने पाहत असतात, तर काही जण त्या कारच्या किंमतीएवढे पैसे नुसते व्हीआयपी नंबरसाठी खर्च करत असतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतात. हरियाणाच्या एका व्यक्तीने त्याच्या फॉर्च्युनर कारच्या व्हीआय़पी नंबरसाठी साडे चार लाख रुपये मोजले आहे. या पैशांत एक अल्टो आली असती.
कॅथलच्या राहणाऱ्या संदीप यांनी आरटीओत ७७७७ या क्रमांकासाठी बोली लावली होती. इतरही लोक स्पर्धेत होते. अखेरीस साडे चार लाख रुपयांच्या बोलीवर नंबर संदीपला मिळाला. आणखी जरी बोली वाढत गेली असती तरी पैसे मोजून मी तो नंबर घेतलाच असता, असे या महाशयांनी सांगितले आहे. संदीपला ७ नंबर आवडतो, यामुळे तो त्याच्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार होता.
माझी मुले, भावाच्या मुलांच्या जन्माची तारीख ही ७ आहे. यामुळे आमची या नंबरशी खूप जवळीक आहे. यामुळे माझ्या दोन गाड्यांचा नंबर ७७७७ आहे. आता फक्त स्कूटीचा नंबर राहिला आहे. जेव्हा नवीन सिरीज सुरु होईल तेव्हा मी कितीही किंमत मोजून स्कूटीलाही ७७७७ नंबर घेईन, असे त्याने सांगितले.
फॉर्च्युनरच्या नंबरसाठी तीन जणांनी बोली लावलेली. मी शेवटची बोली लावलेली. परंतू आधीच्या दोघांनी रक्कम वाढविली नाही. यामुळे माझी रक्कम जास्त असल्याने हा नंबर मला मिळाला. जर त्यांनी माझ्या पेक्षा जास्त बोली लावली असती तर मी देखील त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मोजून हा नंबर घेतलाच असता, असे संदीप म्हणाला.
अशाचप्रकारचा एक प्रकार हिमाचलमध्ये आला होता. स्कूटीच्या नंबरसाठी एका व्यक्तीने १ कोटी रुपयांपेक्षा अधिकची बोली लावली होती. HP99-9999 नंबरसाठी मूळ किंमत १००० रुपये होती, यात २६ जणांनी ऑनलाईन भाग घेतला होता. परंतू, एका व्यक्तीने १ कोटी रुपयांची रक्कम मोजली होती.