नवी दिल्ली-
देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आता वाढताना दिसत आहे. विशेषत: टू-व्हीलर सेग्मेंटमध्ये ग्राहकांनी अधिक पसंती दाखवली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन ऑटो कंपन्या बाजारात वेगवेगळ्या इ-बाइक्सवर काम करत आहेत. आता गुजरातस्थित इलेक्ट्रिक टू-व्हिलर निर्माता कंपनी आर्या ऑटोमोबाइल्सनं स्थानिक बाजारात आपली इलेक्ट्रिक मोटारसायकल Arya Commander लॉन्च करण्याची तयारी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बाईकची विक्री पुढील महिन्यापासून होणार आहे.
Arya Commander बाईकला कंपनीनं क्रूझर बाईकसारखा लूक आणि डिझाइन दिलं आहे. जे नुकतंच रॉयल एनफील्डच्या लोकप्रिय थंडरबर्ड बाईकची आठवण करुन देतं. कंपनीनं यात स्प्लिट कुशन सीट, पेसेंजर फूट रेस्ट आणि डिजिटल इन्स्ट्रूमेंट कंसोल दिला आहे. राऊंड शेप एलईडी हेडलाइन आणि फ्युअल टँकखाली बॅटरीसह इलेक्ट्रिक मोटरचं सेक्शन देण्यात आलं आहे. कंपनीनं यात एनईडी टेललाइटसह एलईडी टर्न सिग्नल लॅम्प देखील दिले आहेत.
बाईकला १७ इंचाचे अलॉय व्हील्स आणि ट्युबलेस टायर देण्यात आले आहेत. तसंच डीसी हब इलेक्ट्रिक मोटरनं चाणाऱ्या या बाईकमध्ये कंपनीनं ड्युअल सस्पेन्शन शॉक अब्जर्वर दिले आहेत. क्लासिक स्टाइलवाल्या या बाइकमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड्स देखील देण्यात आले आहेत. ज्यात इको, स्पोर्ट्स आणि इन्सेन या मोड्सचा समावेश आहे. कंपनीच्या दाव्यानुसार बाईकचं एकूण वजन १३५ किलो इतकं आहे.
मिळतात जबरदस्त फिचर्सइलेक्ट्रिक बाईकमध्ये जीपीएस नेविगेशन, एअर-कुलिंग सिस्टम, डिजिटल स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिपमीटर, ब्लूटूथ कनेक्टिविटी, जियो फेन्सिंग, USB चार्जिंग पोर्ट, टीएफटी कलर डिस्प्ले, रिव्हर्स असिस्ट आणि लो बॅटरी इंडिकेटरसारखे फिचर्स दिले गेले आहेत. या बाईकमध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट अलर्टसह फॉल अँड क्रॅश सेन्सर देखील देण्यात आला आहे. जे कोणत्याही आपत्कालीन स्थितीत तत्काळ अॅक्टीव्ह होतो.