शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

अॅक्सलरेशन सेन्स हा ड्रायव्हिंग करताना सर्वात महत्त्वाचा घटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 3:00 PM

वाहन चालवणे ही कला आहे, ड्रायव्हिंग सेन्स अधिक विकसित करण्यासाठी acceleration sense विकसित करायला हवा, जाणवून घ्यायला हवा. ड्रायव्हिंग व अॅक्सलेशनचा सेन्स ही एक अनुभूती आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग कौशल्यही वाढते व तुमची लवचिकताही.

ठळक मुद्देकारचे उदाहरण घ्यायचे झाले तर आज अनेकजण कार चालवताना सेन्सलेसपणे चालवीत असतातएक्सलरेशन पॅडल म्हणजे पायाने दाबायचा दट्ट्या हा दाबला की वाहनाच्या इंजिनाला इंधन पुरवठा कमी अधिक होत असतोत्याप्रमाणे तुमची कार पुढे तुम्ही दिलेल्या वेगाने सरकत असते

कोणतेही वाहन चालवण्याचे लायसेन्स मिळू शकते. प्रयत्न केला, आरटीओमध्ये चाचणी-परीक्षा दिली, ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले की वाहन चालनाचे लायसेन्स,अनुज्ञप्ती वा परवाना हा मिळणार हे आज गृहितक झालेले आहे. पण वाहन चालवताना मग ती कार असो, बस असो की ट्रक असो त्या वाहनाच्या वेगाची जाण येणे म्हणजेचacceleration sense येणे अतिशय गरजेचे असते. प्रत्येक व्यक्तीला तो सेन्स आला पाहिजे,तसे झाले तर अपघाताचे प्रमाणही खूप कमी होईल व त्याचबरोबर वाहन वापरण्याची व ते टिकवण्याचीही क्षमता वाढू शकेल.

acceleration sense ही संज्ञा जगामध्ये ड्रायव्हिंगच्या जगतात खूप महत्त्वाची मानली जाते. या संज्ञेमध्ये वा संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे तुमची लवचिकता. तुमच्या सर्व इंद्रियांमध्ये ही लवचिकता असावी लागते. त्यामुळे वाहन चालवताना तुमचे अवधान म्हणजे नेमके काय याचीही जाण होते.संवेदनशीलता ही प्रत्येक प्राणीमात्रामध्ये असते, पण ड्रायव्हिंग करताना ती अधिक असायला हवी. त्यावर केवळ तुमचेच नव्हे, तुमच्या वाहनाचेच नव्हे तर इतरांचेही भवितव्य अवलंबून असते.

कारचे उदाहरण घ्यायचे झाले तर आज अनेकजण कार चालवताना सेन्सलेसपणे चालवीत असतात. एक्सलरेशन पॅडल म्हणजे पायाने दाबायचा दट्ट्या हा दाबला की वाहनाच्या इंजिनाला इंधन पुरवठा कमी अधिक होत असतो व त्याप्रमाणे तुमची कार पुढे तुम्ही दिलेल्या वेगाने सरकत असते. तुम्ही ऑटोगीयरवाली कार चालवीत असा वा स्कूटर किंवा मोटारसायकल चालवताना हाताने एक्सलरेशन कमी अधिक करीत असा, भविष्यात इलेक्ट्रिक कारही येणार आहे. या कारलाही अॅक्सलरेशन असणार आहे. ज्या अॅक्सलरेशनमुळे तुमच्या कारची गती नियंत्रित होणार आहे. रस्त्यावर असलेले अडथळे,वाहतूक कोंडी, पादचारी, गतीअवरोधक, समोरून जाणारे व येणारे वाहन या सर्वांचा अंदा घेणे, तुमच्या कारच्या- वाहनाच्या ताकदीचा अंदाज घेणे व आवश्यक तो योग्य वेग देण्यासाठी अॅक्सलरेटरचे पॅडल दाबणे, ही सारी क्रिया वा वर्तन प्रत्येक ड्रायव्हरकडून योचग्य पद्धतीने अपेक्षित आहे.

या वेग वाढवण्याच्या वा कमी करण्याच्या तुमच्या क्रियेला अचूकता असायला हवी, ही अचूकता येण्यासाठी तुमच्या रस्त्यामध्ये काय ताट वाढून ठेवलेले आहे,याची माहिती तुम्हाला प्रत्येकवेळी असतेच असे नाही, रस्ता नेहमीचाच असला तरीही अनेकदा त्या त्या ठिकाणी, वळणावर, चढावर, उतारावर तुम्हाला वेग कमी वा अधिक करावी लागणारी कृती ही ज्या संवेदनांमधून ज्ञात होत असते, वा व्हायवला हवी, तो तीच ही वेग नियंत्रणाची जाण वा acceleration sense . त्यासाठी तुम्ही समोर दिसणारी स्थिती अजमावित असता, त्याप्रमाणे तुमच्या मेंदूला होणारी जाणीव तुम्हाला त्याप्रमाणे आदेश देत असते. पण त्यासाठी तुमची संवेदनशीलता ही देखील तितकीच महत्त्वाची असायला हवी.

बेदरकार नको, दुसऱ्याचा विचार करणारी तुमची संवेदनशीलता ही एखाद्या लवचिक गवताप्रमाणे हवी. ड्रायव्हरच्या आसनावर बसल्यानंतर चक्रधारी श्रीकृष्णाप्रमाणे तुम्ही असता. सारासार बुद्धी, भावना या सर्वांचा तुमच्या acceleration sense वर परिणाम व्हायला हवा. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग करताना अर्जुनाप्रमाणे मला फक्त रस्ता व त्यावरील वाहतूक,पादचारी दिसत आहेत, ही जाण असावी. तुमच्या मनानुसार कारचा वेग वाढवून उपयोगाचा नाही, तो बुद्धीशी निगडीत आहे, त्या त्या क्षणाला निर्णय घ्यावा लागतो, तो दुसऱ्या क्षणाला वेगळाही असू शकतो. त्याचनुसार तुम्हाला एक्सलरेटरवरील पायाचा दाब कमी अधिक करायला लागतो.

मोटारसायकल वा स्कूटरवर असाल तर थ्रॉटलवर तो एक्लरेशनचा हात योग्य वेग ठेवण्यासाठी हलवावा लागतो. सांगतायचा मुद्दा हाच की, ड्रायव्हिंग सेन्समध्ये तुमच्या acceleration sense चा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. तो विकसित करणे हे फक्त आणि फक्त तुमच्या हाती आहे. हा सेन्स विकसित करणे म्हणजेच बहुतांशी ड्रायव्हिंग कौशल्याचाचा डोंगरच पार केल्यासारखे आहे.

टॅग्स :carकारAutomobileवाहन