जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वाढत आहे. दैनंदिन प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरसोबतच आता इलेक्ट्रिक सायकलचाही पर्याय उपलब्ध झाला आहे आणि त्यास चांगली पसंती देखील मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता वाहन निर्मात्या कंपन्या नवे मॉडल बाजारात आणण्याच्या मार्गावर आहेत. दिग्गज गॅजेट्स कंपन्या देखील यातील शर्यतीचा भाग बनत आहेत. तैवानची बहुराष्ट्रीय हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी Acer जी भारतीय बाजारात आपले लॅपटॉपसाठी खूप लोकप्रिय आहे. या कंपनीनंही आपल्या नव्या इलेक्ट्रिक सायकल बाजारात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
Acer पीसी निर्माती कंपनी आता इलेक्ट्रिक बाइक बाजारातही पाऊल टाकत आहे. कंपनीनं आपली नवी इलेक्ट्रिक सायकल Acer ebii लॉन्च करण्याची तयारी केली आहे. ही एक हलकी ई-बाइक सारखीच आहे. जी खास पद्धतीनं शहरी भागांसाठी डिझाइन करण्यात आली आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तांत्रिक सुविधांसह उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक सायकल रस्त्याची स्थिती ओळखून आपोआप गिअर देखील बदलू शकते.
कशी आहे Acer ebii सायकल?वजनानं खूप हलकी Acer ebii इलेक्ट्रिक सायकल दैनंदिन वापरासाठी खूप आरामदायक आहेच. पण ड्रायव्हिंग रेंज देखील चांगली आहे. या सायकलचं वजन फक्त १६ किलो इतकं आहे आणि बाजारात उपलब्ध बहुतांश ई-बाइकच्या तुलनेत खूप हलकी आहे. याची टॉप स्पीड जवळपास २५ किमी प्रतितास इतकी आहे आणि ड्रायव्हिंग रेंज ११० किमीच्या जवळपास आहे.
इलेक्ट्रिक सायकलच्या फ्रेममध्येच बॅटरीला जागा देण्यात आली आहे. याची बॅटरी फक्त २.५ तासात पूर्ण चार्ज होते. विशेष म्हणजे यातील पावर ब्रेकचा वापर करुन तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा फोन देखील चार्ज करू शकता. कंपनीनं या सायकलसाठी डेडिकेटेड EBii मोबाइल App देखील तयार केलं आहे.