चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यानं सेमी-कंडक्टरच्या उपलब्धतेवर गंभीर परिणाम झाले आहेत. चालू महिन्यात देशातील सर्वात मोठी कार निर्माता मारुती सुझुकीच्या उत्पादन कार्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी डिसेंबरमध्ये सुमारे १,३५,०००-१,४०,००० युनिट्सचे उत्पादन करण्याची शक्यता आहे, जे गेल्या १३ महिन्यांतील सर्वात कमी उत्पादन आहे.
कंपनीनंही याबाबतची पुष्टी केली आहे. “इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे डिसेंबर २०२२ मध्ये उत्पादनावर अलीकडच्या काही महिन्यांपेक्षा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. हा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व संभाव्य उपाययोजना केल्या जातील", असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
१० हजार युनिटचे नुकसान होण्याची शक्यतागेल्या काही दिवसांत सेमी कंडक्टरचा पुरवठा बिघडला असून सुमारे १०,००० युनिट्सचे संभाव्य उत्पादन तोटा होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चीनमधील लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी पुन्हा विस्कळीत झाली आहे आणि उत्पादन योजनांमध्ये आणखी अनिश्चितता वाढली आहे. मारुती सुझुकीचे शेवटचे उत्पादन ऑक्टोबर २०२१ मध्ये १.३५ लाख युनिट होते.
इतकं होऊ शकतं नुकसान५.५१ लाख रुपये प्रति युनिट या सरासरी विक्री किमतीवर आधारित सुमारे १०,००० युनिट्सच्या उत्पादनाच्या तोट्यामुळे कंपनीला ५५१ कोटी रुपयांचा महसूल तोटा होईल. मारुती सुझुकीने जुलै २०२२ मध्ये १,८४,८९० युनिट्सचे सर्वोच्च उत्पादन नोंदवले होते. जेव्हा सेमीकंडक्टर संकट कमी होतं आणि किरकोळ विक्रेत्यांकडून पुरवठा सुधारला होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून उत्पादनात हळूहळू घट होत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये, मारुतीनं १,५२,७८६ युनिट्सचे उत्पादन केले. जे मागील वर्षी याच महिन्यात उत्पादनाच्या जवळपास आहे.