जयदीप दाभोळकर , लोकमत डॉट कॉम
जर तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बाहेरून बसवत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सीएनजी किट बसवल्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्या पूर्ण केल्यानंतर, तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय सीएनजी कार चालवू शकता.
तुम्ही बाहेरून सीएनजी किट बसवत असाल तर किटची नोंदणी आरसी आणि विमा पॉलिसीमध्ये करा. तसे न केल्यास अपघात झाल्यास अडचणी वाढू शकतात. कंपनी क्लेम देण्यास नकार देऊ शकते. म्हणूनच किट बसवल्यानंतर, सीएनजी किट आरसी आणि विमा पॉलिसीमध्ये नोंदवणे आवश्यक आहे.
आरसीसाठी जवळच्या आरटीओ कार्यालयात माहिती द्यावी लागेल. जर पॉलिसीमध्ये नोंद नसेल तर कधी अपघात झाल्यास कंपनी तुम्हाला पूर्ण क्लेम देणार नाही. कंपनी एकूण दाव्याच्या रकमेपैकी अंदाजे २५ टक्के कपात करू शकते. म्हणूनच विमा काढताना सीएनजी किटचा विमा काढणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, जर सीएनजी किटची माहिती नोंदणी प्रमाणपत्रात नसेल किंवा पॉलिसीमध्ये नोंदणीकृत नसेल, अशा स्थितीत कंपन्या क्लेमसाठी नकार देऊ शकतात. याशिवाय सीएनजी बसवलेलं वाहन नोंदणी न करता चालवणे बेकायदेशीर मानले जाते. यासाठी चालानदेखील कापले जाऊ शकते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"