Electric Scooter : सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसून येत आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटरकडे आकर्षित करण्यासाठी ओलाने (Ola) आधी किमती कमी केल्या होत्या. यानंतर आता एथरनेही (Ather) इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीवर 25 हजार रुपयांपर्यंत सूट देऊ केली आहे. तुम्ही पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर आणि बाईला कंटाळला असाल, तर तुम्हाला एका मोठ्या डिस्काउंट ऑफरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची संधी आहे.
यासाठी तुम्हाला फक्त ओला किंवा एथरकडून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी लागेल. एथरने आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती कमी केल्या आहेत. ज्यामध्ये Ather 450 S ची किंमत 20 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. तर Ather 450 X ची किंमत 25 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता तुम्ही Ather 450 S केवळ 1,15,599 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच, Ather 450 X फक्त 1,15,599 रुपयांना खरेदी करू शकता.
एकीकडे ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील समस्या आणि वेळेवर दुरुस्ती होत नसल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अशातच ओलाने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. या ऑफरमध्ये Ola S1 X+ ची किंमत आधी 1.09 लाख रुपये होती, जी आता 84,999 रुपये झाली आहे. Ola S1 Air मॉडेलची किंमत 1.19 लाख रुपयांवरून 1.05 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच, Ola S1 Pro मॉडेलची किंमत आधी 1.48 लाख रुपये होती, जी आता 1.30 लाख रुपये झाली आहे.
या स्कूटरमध्ये 2.9 kWh बॅटरी आहे, जी एकदा फूल चार्ज केल्यानंतर 115 किलोमीटर (IDC) पर्यंतचे अंतर कापू शकते. 5.4 किलोवॅट मोटर असलेल्या या स्कूटरच्या परफॉर्मेंसबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर 3.9 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग पकडते. 90 kmph च्या टॉप स्पीडसह येत असलेल्या, या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घरी 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी जवळपास 6 तास 36 मिनिटं लागू शकतात.